पु णेः पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून २० मोबाईल फोन व इतर मुद्देमालासह २ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात युनि...
पुणेः पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून २०
मोबाईल फोन व इतर मुद्देमालासह २ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात युनिट-१ गुन्हे
शाखेला यश आले आहे.
नमुद आरोपींची पोलिस
कोठडी रिमांड घेवुन त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांनी संगनमत करुन
दिल्ली हैद्राबाद पुणे मुंबई गुजरात असे रेल्वे प्रवासादरम्याण चोरलेले किंमत
रु.०१,०७,०००/- रु. चे एकुण २० विविध कंपनीचे मोबाईल
फोन जप्त करण्यात आले आहे. जप्त मोबाईल पैकी दोन मोबाईल पुणे शहर हद्दीतून चोरले
असल्याचे निष्पन्न झाले असून २ गुन्हे उघडकीस आले आहे. सदरचे अटक आरोपी यांची
रेल्वे प्रवासा दरम्यान तसेच गर्दीचे ठिकाणी मोबाईल चोरीचे गुन्हे करणारी
अंतरराज्य टोळी आहे. तसेच सदर आरोपींनी पुणे जिल्हयासह हैद्राबाद, गुजरात, मुंबई, दिल्ली येथे मोबाईल
चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची
शक्यता असून त्या अनुषंगाने आरोपींकडे तपास सुरु आहे. यातील आरोपी विजय गगनदेव
महातु व अशोक कुमार महातु यांचे विरुध्द दिल्ली व सिकंदराबात येथील पोलिस ठाणेत
मोबाईल चोरी व जबरी चोरीचे असे ८ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलिस
आयुक्त अभिताभ गुप्ता, रामनाथ पोकळे - अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे पोलिस
उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, गजानन टोम्पे सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील
वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सपोनि अशिष कवठेकर, पो उप-नि संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी पोलिस अंमलदार अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, अभिनव लडकत, शुभम देसाई, निलेश साबळे, विठ्ठल साळुंखे, अजय थोरात, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.
COMMENTS