आंबेगाव (पुणे): मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील गावात चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले असून, ५६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्त...
आंबेगाव (पुणे): मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील गावात चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले असून, ५६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कपड्याचे दुकान, किराणा मालाचे दुकान, हॉटेल, मोटार सायकल चोरी प्रकरणी अटक केली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सुनील बबन खेडकर (वय 53 रा. मंचर ता. आंबेगाव) यांनी फिर्यादी दिली आहे. आरोपी १) मोहसीन हनिफ शेख (राहणार विश्रांतवाडी येरवडा पुणे), २) सागर गायकवाड, ३) यश, ४) सागर व एक मित्राचे नाव माहित नाही. २०/८/२०२२ रोजी पहाटे मंचर गावच्या हद्दीत श्री मेन्स वेअर व कलेक्शन, हॉटेल स्टार बार, सेकंड स्टोअर्स व आशानंद सोसायटी मोटर सायकल ५६हजार १५० यांचा मुद्देमाल मोटर सायकल चोरी केल्या प्रकरणी पाठलाग करून पुसद आरोपींना अटक केली आहे.
चोरटे मोटारसायकलवरून पळून जात असतना पोलिस शिपाई दिनेश माताडे, पोलिस हवालदार डावखर पोलिस शिपाई सुनील काटे यांनी एका चोरट्याला रंगेहाथ पकडले. मंचर मध्ये पाच ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे. पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार हिले करत आहेत.
COMMENTS