सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव सन 2022 बीटस्तरीय स्पर्धा मोठ्या उत...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव सन 2022 बीटस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात जि.प.प्राथ.शाळा उच्छिल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी बीट आपटाळेच्या नूतन विस्तार अधिकारी मा.संचिता अभंग ह्या होत्या तर कार्यक्रमाच्या आयोजक उच्छिल केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. पुष्पलता पानसरे तर प्रमुख मान्यवरांमध्ये श्री.सतिश बोरकर केंद्रप्रमुख इंगळूण केंद्र, श्री.आनंदा मांडवे केंद्रप्रमुख तांबे केंद्र व आपटाळे केंद्राच्या वतीने श्री. खंडेराव ढोबळे व श्री.भरत बोचरे हे उपस्थित होते. बीट आपटाळे मधील सर्व शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी आणि प्रत्येक केंद्रातील प्रथम क्रमांकाचे विजयी स्पर्धक उपस्थित होते. यामध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व, सामान्यज्ञान व प्रश्नमंजुषा आणि वेशभूषा अशा सहा प्रकारच्या स्पर्धा लहान, मध्यम व मोठ्या गटात घेण्यात आल्या होत्या. प्रथमतः राष्ट्रगीताने सुरवात करून सुंदर स्वागतगीताने झाल्यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार समारंभ संपन्न केल्यानंतर मान्यवरांनी उपस्थित सर्व स्पर्धक तसेच शिक्षकांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे उत्तम असे आयोजन व नियोजन उच्छिल केंद्राच्या वतीने केले यात मुलांना खाऊ जेवण तसेच तीनही क्रमांकासाठी उत्कृष्ट अशी बक्षीसे देण्यात आली होती तर श्री.सुभाष मोहरे यांनी स्वः दातृत्वातून सुरेख सुंदर अशी प्रमाणपत्र विजयी स्पर्धकांना वाटप करण्यात आले.
स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मार्गर्शन करताना बीटच्या विस्तार अधिकारी सौ. संचिता अभंग यांनी सांगितले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे असून, त्यासाठी शिक्षकांनीही विविध नवनवीन कौशल्य आत्मसात केले पाहिजे तसेच मुलांना आपले ज्ञान दिले पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या स्पर्धेचे या शाळेने खूप उत्कृष्ट नियोजन व आयोजन केल्याने शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान व कौतूक करण्यात आला आणि भविष्यात पश्चिम आदिवासी भागात अधिक लक्ष देणार असल्याचे मनोगतातून त्यांनी व्यक्त केले. या स्पर्धेचे परीक्षण बीटचे अनेक शिक्षकवृंद यामध्ये श्री.रमेश कोकाटे खानगाव, श्रीम.मंगल मरभळ सुराळे, श्री.चांगदेव जोशी, श्री.विलास साबळे तांबे, सौ.विजया जोशी, सौ. कमल मुन्हे सोनावळे, श्री.संतोष चिलप इंगळूण, श्री.सागर भवारी कालदरे, सौ.शोभा उंडे वानेवाडी, सौ.निशा साबळे सौ. छाया अरगडे आंबोली इत्यादी शिक्षकांनी परीक्षण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुभाष मोहरे यांनी तर प्रास्ताविक सौ पुष्पलता पानसरे यांनी तर नियोजन सौ.स्मिता ढोबळे, सौ.आरती मोहरे व सौ.लिलावती नांगरे यांनी सुंदर केले तर शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद यांनी मानले.
COMMENTS