सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) माजी सैनिक सन्मान सोहळा, शोभायात्रा, चित्रप्रदर्शन, देशभक्ती पर गीते, विद्यार्थी-वेशभूषा स्पर्धा, विवि...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
माजी सैनिक सन्मान सोहळा, शोभायात्रा, चित्रप्रदर्शन, देशभक्ती पर गीते, विद्यार्थी-वेशभूषा स्पर्धा, विविध स्पर्धा इत्यादी चा समावेश.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त "उत्सव स्वातंत्र्याचा,सन्मान माजी सैनिकांचा,भारत मातेच्या थोर सुपुत्रांचा" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी सैनिकांबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून व आदराप्रति दरवर्षी समर्थ संकुलात या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर उपलब्ध शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान देशाची खरी संपत्ती आहे.
यावेळी समर्थ क्रीडा संकुलापासून ते पॉलिटेक्निक च्या मुख्य प्रवेश द्वारापर्यंत दुतर्फा झेंडे, पताका घेऊन लेझीम च्या तालावर विद्यार्थ्यांनी चित्ररथातून उपस्थित सर्व माजी सैनिकांची जंगी मिरवणूक काढली.भारत माता कि जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम,भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो अशा घोषणानी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, विनायक सावरकर, भगतसिंग, बाबू गेनू अशा अनेक वेशभूषा गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी साकार केल्या.संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी सादर केलेल्या 'ए मेरे वतन के लोगो' या गीताने सर्वांचे डोळे पानावले.
शूरवीर जवानांच्या अपार शौर्याची कहाणी मांडताना सर्वसामान्य माणसामध्ये व सैनिकांमध्ये एक सुंदर भावबंध निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग देशसेवेसाठी करावा असे प्रतिपादन जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष देविदास भुजबळ यांनी केले.
आपल्या लष्करी बांधवांना, आपल्या सैनिकांना कोणत्या अवघड परिस्थितीत कशा तर्हेच्या कठीण हवामानात किती काळ राहावं लागतं याबाबतचे अनुभव यावेळी माजी सैनिकांनी कथन केले. माजी सैनिकांचे चित्तथरारक अनुभव ऐकताना सर्वांच्या अंगावर शहारे उमटत होते. गोपीनाथ कुटे, गोपीनाथ कसाळ, नवनाथ गाढवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सर्व माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाबरोबरच स्वच्छता अभियान, शिक्षक-पालक चर्चासत्र, पोस्टर बनवा स्पर्धा, रांगोळी स्पर्धानिबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदि विविध कार्यक्रमाचे आयोजन संकुलामध्ये करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष देविदास भुजबळ, उपाध्यक्ष दिलीप आरोटे, सचिव नवनाथ गाढवे, कॅप्टन महादेव हाडवळे, लेफ्टनंट उमेश अवचट, निवृत्त पोलीस अधिकारी गोपीनाथ कसाळ, गोपीनाथ कुटे, बाळासाहेब मूळे, सुधीर खेबडे, सतीश भुजबळ व आर्मी, नेव्ही,एयर फोर्स मधील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिक तसेच एच पी नरसुडे, एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत, डॉ.शिरीष गवळी, बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप, अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले, ज्युनियर च्या प्राचार्या वैशाली ताई आहेर,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, लॉ चे प्राचार्य डॉ.विजय पानमंद तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, ज्ञानेश्वर जाधव, प्रा.अमोल भोर, प्रा.विपुल नवले, प्रा.दिनेश जाधव यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.
सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक वल्लभ शेळके सर यांनी तर आभार डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.
COMMENTS