रांजणगाव गणपती : पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रो...
रांजणगाव गणपती : पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला. अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीतील एल.जी.कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला आहे. मयत सर्व पनवेलला जाण्यासाठी निघाले होते.
ट्रक चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला आहे. ही कार पुण्याहून पनवेलकडे निघाली होती. यावेळी पुणे-अहमदनगर मार्गावर एक ट्रक चुकीच्या बाजूने आला. ट्रक अचानक रस्त्याच्या मधे आल्याने कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील पाच जणांवर काळाने घाला घातला. अपघात इतका भीषण होता की, कारमधील पाच जण जागीच ठार झाले. या शिवाय कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
COMMENTS