ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : ग्रामपंचायत येणेरे यांच्या सौजन्याने श्री छत्रपती हायस्कूल येणेरे विद्यालयात एक व...
ग्रामिण प्रतिनिधी
: आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : ग्रामपंचायत येणेरे यांच्या सौजन्याने श्री छत्रपती हायस्कूल येणेरे विद्यालयात एक विद्यार्थी एक रोपटं ही संकल्पना जालिंदर ढोले सर यांच्या सहकार्याने व उपसरपंच अमित ढोले यांच्या पाठपुराव्याने साकार झाली. प्रत्येक विद्यार्थ्यास एक झाडाच रोपटं अशी ४०० रोपटी वाटण्यात आली. हा कार्यक्रम आज पार पडला.
मान्यवरांचा सत्कार विदयालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी वक्त्यांची भाषणे झाली यात प्रत्येक विद्यार्थ्याने एक वर्षानंतर आपण लावलेल्या वृक्षाचा वाढदिवस वर्षभर साजरा करून अभ्यासा बरोबर व्यवस्थित झाडाचे संगोपन करायचे. सर्व विदयार्थ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट संगोपन करणारे ११ विद्यार्थी निवडून त्यांना पारितोषक देवून त्यांचा विशेष सत्कार करावा असेदेखील वक्त्यांनी नमूद केल. हा कार्यक्रम छान खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. ढगांच्या उन सावलीच्या खेळात मुलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. बाजीरावशेठ यांनी येणेरे परिसरात प्रत्येक वर्षाला कमीतकमी १० हजार झाडे लावली जातात व ती उत्तम प्रकारे जोपसली जातात. त्यामुळे हा परिसर वृक्षांच नदंनवन आहे. असेदेखील नमुद केले.
सर्व वक्त्यानी वृक्षाचें
फायदे व वृक्षतोडीचे तोटे मुलांशी सवांद साधून व कवितांच्या माध्यमातून समजावून
सांगितले. कार्यक्रमास पी. टी. शिंदे, रानमाळा पॅटर्नचे प्रणेते, सातपूते साहेब ( DFO
) उप वनसंरक्षक (खेड,जुन्नर,आंबेगाव,शिरुर),
सागर शेलार शिवनेरी मिसळचे प्रोप्रायटर, राजन जाभंळे सचिव पर्यावरण जागर समिती, भोर व्हि
एम राष्ट्रपती पारितोषक विजेते, डी एम
चव्हाण क्रिडा मार्गदर्शक, उपवनसरंक्षक अमोल
सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिदें, वनपाल नितिन विधाटे, वनरक्षक रमेश
खरमाळे, रविंद्र मलघे ग्रामसेवक येणेरे, सभापती
बाजीराव ढोले, वि.का.सो चेअरमन लक्ष्मण ढोले, .उपसरपंच अमित ढोले, पोलीस पाटील
सत्यवान घोगरे, म्हातारबा ढोले,
दत्तोबा ढोले, सुभाष ढोले, विश्वास ढोले सर,
गुलाब ढोले, भरत ढोले, बापू जठार व येणेरे येथील ग्रामस्थ मोठ्या
संख्येने हजर होते. कार्यक्रमाची रूपरेषा हायस्कूलच्या वतीने करण्यात आली. पाडली.
COMMENTS