कोल्हापूर: एका युवकाने बुधवारी (ता. ३) रात्री दोनच्या सुमारास व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवला आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दत्तव...
कोल्हापूर: एका युवकाने बुधवारी (ता. ३) रात्री दोनच्या सुमारास व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवला आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दत्तवाड (ता. शिरोळ) येथे घडली.
सिद्धार्थ सुभाष जाधव (वय 19) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिद्धार्थ याने मलिकवाड रोड दत्तवाड येथील आपल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला बुधवारी मध्यरात्री गळफास लावून घेतला. सिद्धार्थ बारावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुरुंदवाड पोलिस पुढील तपास करीत आहेत. सिद्धार्थच्या आत्महत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, कोल्हापूरातील उच्चशिक्षित डॉक्टर युवतीने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. अपूर्वा हेंद्रे असे तिचे नाव असून ती प्रसिद्ध डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे याची कन्या आहे. ताराबाई पार्क येथील डी मार्टच्या समोर ती बेशुध्द अवस्थेत सापडली होती.
COMMENTS