नवी दिल्ली : प्रेम हे आंधळे असते तसेच ते कोणावरही होते हे खरे आहे. प्रेमात वयोमर्यादा देखील पहिली जात नाही ही बाब अनेकवेळा समोर आलीय. अशातच ...
नवी दिल्ली : प्रेम हे आंधळे असते तसेच ते कोणावरही होते हे खरे आहे. प्रेमात वयोमर्यादा देखील पहिली जात नाही ही बाब अनेकवेळा समोर आलीय. अशातच प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीव गमवावा लागल्याची भयंकर घटना समोर आलीय.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या टीकरी बॉर्डर भागात 18 वर्षांचा तरुण आणि 48 वर्षांची महिला यांच्यातील प्रेमसंबंधात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिची आई आणि 18 वर्षीय आरोपी हरीश यांच्यातील मैत्री आवडत नव्हती. तिने अनेकदा याचा विरोधही केला होता. त्यामुळेच तरुणाने तिचा काटा काढला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला तिच्या आईचं प्रेमप्रकरण माहीत होतं पण तिचा याला विरोध होता. त्यामुळेच संतापून आरोपी हरीशने मुलीला मारण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. समीर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साधारण 1 वाजता पोलिसांना एक कॉल आला. यामध्ये एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा चाकूने गळा कापल्याचं सांगण्यात आलं. तेथील काहींनी आरोपीला पकडून ठेवलं.
COMMENTS