प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे चिंचोली : विकास प्रतिष्ठान - महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने नियमितपणे अनेक शैक...
प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे
चिंचोली : विकास प्रतिष्ठान - महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने नियमितपणे अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. सालाबादप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य महोत्सवनिमित्त मु. पो. चिंचोली, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील श्री मधुकरराव विद्यालयातील दहावीमध्ये अथक परिश्रम करून उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या व जिल्हा परिषद शाळेतील तालुका स्तरीय वेशभूषा व चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन वाढण्यासाठी गुणगौरव सोहळा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन साजरा करण्यात आला प्रसंगी विकास प्रतिष्ठान - महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास डोळस, उपाध्यक्ष गणेश ससाणे, मार्गदर्शक शांतू डोळस, सरपंच खंडूशेठ काशिद, डी वाय एस पी निलेश वाजे साहेब, बाळासाहेब गुंजाळ, निलेश काशिद सर, डॉ. सतिष ताजणे सर, श्री. समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, श्री मधुकरराव विद्यालय व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS