सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतभरात, संपन्न होत असतानाच...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतभरात, संपन्न होत असतानाच, दि १५ ऑगस्ट रोजी जुन्नर येथील आमच्या राजाराम पाटील जेष्ठ नागरिक आधार केंद्रातही, ज्यांनी पारतंत्र्यातील गुलामी,आणि आता स्वातंत्र्यातील लोकशाही अनुभवली अशा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असणाऱ्या,वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या सन्माननीय जेष्ठांच्या उपस्थीतीत,व त्यांच्या हस्तेच अखंड स्वतंत्र हिंदुस्थानच्या प्राण,अर्थात तिरंग्याचे ध्वजारोहण, देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात पार पडले.
पारतंत्र्यात ज्या, केवळ एका घोषणे साठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची, किंबहुना संपूर्ण जीवनाची होळी करून हौतात्म्य पत्करले,जुलमी ब्रिटिशांच्या गोळ्या निधड्या छातीने अंगावर झेलल्या,अन कित्येक क्रांतिवीर फासावर चढले, त्या एका वंदे मातरम या घोषणेने आज,आमचा वृद्धाश्रम दणाणून गेला.देशप्रेम तनामनात संचारले उपस्थित प्रमुख जेष्ठ नागरिक तथा पाहुण्यांनी, देशाच्या स्वातंऱ्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देऊन, स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या मनोगतातून साक्षात जागृत केला.
भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वर्षीय सोहळ्याचे औचित्य साधून,परिसरातील,तालुक्यातील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ सन्मानीय अतिथी, आमंत्रित होते. संचालक मंडळाकडून त्यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.. वृद्धाश्रमातील या ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मान्यवर जेष्ठांमध्ये, प्रा.श्रीभालवणकर सर, डॉ.प्रमिलाताई जुन्नरकर, श्री सीताराम बाबा भोर, रोहिदास बनकर, श्री दत्तात्रय बोडके, श्री विनोद थापेकर, श्री दिलीपराव लामखडे, श्री प्रशांत काशीद, श्री गाढवे, मार्गदर्शक-श्री भाऊसाहेब काशीद, आणि श्री. राजेंद्र पांडे आदी मान्यवर उपस्थित होते,
तसेच राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे अध्यक्ष श्री विवेक तांबोळी, व सचिव मंगेश गाढवे यांनी मान्यवरांचा यथोचित सन्मान केला.खजिनदार उत्तम चौधरी, संचालक श्री भानुदास कोकणे, संचालीका सौ. ज्योती पांडे उपस्थित होते, संचालक श्री अत्तार सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी प्राणांची होळी केली,त्यांचे स्मरण नेहमी आपण सर्वांनीमनात ठेवून ,आपला तिरंगा नेहमी जगाच्या अवकाशात सतत सर्वाधिक उंचीवर ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी कटीबद्द असायला हवे असा मान्यवरांनी
मौलिक संदेश देत,समारोपप्रसंगी पुन्हा एकदा, वंदे मातरम, आणि भारत माता की जय ह्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, आणि देशभक्तीपर एक अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS