प्रतिनिधी: सचिन भोजणे ( शिवव्याख्याते ) जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथील स्वप्नवेध अनाथालय येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वा...
प्रतिनिधी: सचिन भोजणे ( शिवव्याख्याते )
जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथील स्वप्नवेध अनाथालय येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी व जवळच्या नंबरचे चश्मे दिले जाणार आहेत, तसेच रक्तातील साखर, डायबेटीस, कॅन्सर, लैंगिक समस्या, गुडघेदुखी,पॅरालिसिस, मूळव्याध, संधिवात, वजन कमी जास्त समस्या, दमा, गॅस, अॅसिडिटी, अपचन, जुना खोकला, निद्रानाश, ताणतणाव इ. आजारांशी विविध तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.
या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंगरूळ ग्रामस्थ व स्वप्नवेध अनाथालय संस्थापक सचिन भोजने यांनी केले आहे.
COMMENTS