सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) संगणक व विज्ञान प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न. आधुनिक शिक्षणाची कास धरून युनायटेड इंग्लिश स्कूलने वि...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
संगणक व विज्ञान प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
आधुनिक शिक्षणाची कास धरून युनायटेड इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे, अत्यल्प शैक्षणिक शुल्क घेऊन दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील आहे. उत्तम भौतिक सुविधा देणाऱ्या युनायटेड इंग्लिश स्कूलचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे मनोगत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
शिया मदरसा एज्युकेशन ट्रस्ट,जुन्नर संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या संगणक व विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ.अमोल कोल्हे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,शिया समाज जुन्नरचे अध्यक्ष मौलाना सय्यद नुरे अब्बास, युनायटेड स्कूलचे अध्यक्ष सय्यद युशा, माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण, कादरीया संस्थेचे अध्यक्ष रऊफ खान, शिया समाज संस्थेचे सचिव सय्यद अमीर अली, शाळा सचिव सय्यद अब्बास इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
" राष्ट्रहित जोपासत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन उत्तम नागरिक व्हावे. गाव, समाज आणि देशाचा गौरव आपल्या कर्तृत्वाने आपण वाढवावा.समाजाप्रती कृतज्ञताभाव कायम जोपासावा " असेही यावेळी डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले." जुन्नर शहरातील अल्पसंख्यांक शिया मुस्लिम समाजाने शिक्षणाचे उभे केलेले हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे.आपल्या सामाजिक व शैक्षणिक विकास कार्यासाठी आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू असे मनोगत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी हस्तकलेतून तयार केलेल्या वैज्ञानिक शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते समाजासाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणारे मौलाना नुरे अब्बास सय्यद आणि पुणे जिल्हा होमगार्डचे समुपदेशक मुराद अब्बास यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मिसबाह शेख यांनी केले व सूत्रसंचालन जरीन शेख यांनी केले. उपस्थितांचे आभार अध्यक्ष सय्यद युशा यांनी मानले.
COMMENTS