प्रतिनिधी: प्रशांत धोत्रे स्व. रामदास शेठ लोहकरे प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान आज 15 ऑगस्ट 2022...
प्रतिनिधी: प्रशांत धोत्रे
स्व. रामदास शेठ लोहकरे प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान आज 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मौजे आळू या ठिकाणी स्व. रामदास शेठ लोहकरे प्रतिष्ठाणच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे आळू येथे २७ विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप करण्यात आले व अतिशय चांगले शैक्षणिक व सामाजिक काम करत असलेले शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संतोष पाडेकर सर यांना प्रतिष्ठाण च्या वतीने शाल, सन्मान चिन्ह देऊन गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी प्रतिष्ठाण चे अध्यक्ष अलताब मोमीन, उपाध्यक्ष गणपत तळपे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आगार प्रमुख रमेश जी हांडे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य गाभा समिती सदस्य बुधाजीराव शिंगाडे, सांगणोरे गावच्या सरपंच अनिताताई शिंगाडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जालिंदर घाडगे, मा.अध्यक्ष पंकज हांडे, माजी उपसरपंच नवनाथ शेठ सुकाळे, दादासाहेब हांडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब हांडे, पांडुरंग हांडे, सामाजिक कार्यकर्ते शरद घाडगे, ग्रा. पंचायत सदस्य सूर्यकांत जाधव या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संतोष पाडेकर यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आदिवासी सोसायटी पिंपळगाव जोगा चे चेअरमन गणपत बोकड, सेवानिवृत्त पी. एस. आय. तुकाराम लांघी साहेब, रामदास लोहकरे, सखाराम बोकड, चिंतामण मुठे, दत्तात्रय लोहकरे, आत्माराम धोत्रे, मारुती तळपे, नवनाथ पाडेकर, लक्ष्मण लोहकरे, धोंडीभाऊ लोहकरे,मनोहर मुठे, गुलाब सुपे, प्रभाकर गवारी, पत्रकार नितीन बोकड, विजय भोईर, तुकाराम लोहकरे, अनिल तळपे, लक्ष्मण भले, काशिनाथ भले,भाविक धोत्रे, बाळासाहेब लोहकरे, अंगणवाडी सेविका सौ हांडे मॅडम, मदतनीस सुमन मुठे,सर्व महिला भगिनी सर्व विद्यार्थी व तरुण मंडळ, सर्व ग्रामस्थ, प्रतिष्ठाण चे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वच आदरणीय ग्रामस्थ व तरुण मंडळाचे मनापासून आभार!!
COMMENTS