वडगाव सहानी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आज जि. प. शाळा वडगाव सहानी व शिंदेमळा तसेच गावातील सर्व अंगणवाड्या( वडगाव सहानी गावठ...
वडगाव सहानी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आज जि. प. शाळा वडगाव सहानी व शिंदेमळा तसेच गावातील सर्व अंगणवाड्या( वडगाव सहानी गावठाण, वरसुबाई मळा व शिंदे मळा), मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅगचे वाटप श्री. किसन मारुती तोडकर आदर्श मुख्याध्यापक व सौ इंदुमती किसन तोडकर आदर्श शिक्षिका यांच्या सौजन्याने गावच्या आदर्श सरपंच सौ वैशालीताई भाऊसाहेब तांबोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री राजेंद्र किसन तोडकर व आदर्श शिक्षक श्री महेंद्र किसन तोडकर यांचा सत्कार शाळेच्या वतीने श्री हंबीरशेठ भिकाजी वाबळे चेअरमन व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमेश वाबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी चेअरमन मधुकर भोर, ग्रामपंचायत सदस्य श्री गहिनीनाथ भोर, सौ.स्नेहलताई तांबोळी, ग्रामसेविका श्रीमती भवारी मॅडम, श्री अमोल तांबोळी उपाध्यक्ष, मंगेश वाबळे, गणेश तांबोळी, पोलीस पाटील गणेश जेडगुले, चंद्रकांत गणपत वाबळे पाटील, चंद्रकांत तांबोळी, संजय मंडले, वैजनाथ निसरगंध, शांता मारुती मंडले, आशा जेडगुले, आनंदराव वाबळे,अंगणवाडी ताई, निता वाबळे, स्वाती तांबोळी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. राजेंद्र बेलवटे सर यांनी केले तर आभार नितीन कडुसकर सर यांनी मानले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
COMMENTS