प्रतिनिधी : शरद शिंदे क्राईमनामा Live : आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला....
प्रतिनिधी : शरद शिंदे
क्राईमनामा Live : आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वाद्यांचा गजरात घोषणा देत प्रभातफेरी काढली. प्रभातफेरीमध्ये ग्रामस्थ सहभागी झाले. प्रथम ग्रामपंचायत ध्वजारोहण ग्रामसेविका ढोरे मॅडम यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे पोलिस पाटील अशोक खंडू मातेले यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व ध्वजप्रतिज्ञा सादर केली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे शाखा अभियंता मा. रामदास आढारी साहेब प्रमुख पाहुणे व सभेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आढारी साहेब यांच्यावतीने शाळेसाठी एक संगणक संच प्रदान करण्यात आला.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यावेळी दुध व्यावसायिक पवळे यांनीही सुंदर देशभक्तीपर गीते सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यानंतर शाळेतील १००% विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. ग्रामस्थांनी बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अमृत महोत्सवानिमित्त केंद्र, बीट व तालुका पातळीवर क्रमांक प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेला व विद्यार्थ्यांना मदत करणा-या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामस्थांच्यावतीने अंकुशशेठ मातेले, बन्सीशेठ चतुर व रामदासशेठ चतुर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच केंद्र प्रमुख दत्तात्रय शिंदे व कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास आढारी साहेब यांनीही मनोगत व्यक्त केले व स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना खाऊसाठी सुमारे ६०००/- निधी जमा केला. ग्रामपंचायतीच्या वतीनेही विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक पंढरीनाथ उतळे, मंगल मरभळ यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. यावेळी गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, माजी विद्यार्थी, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव ढोबळे यांनी सूत्रसंचालन केले तर देवराम भांगे यांनी सर्वांचे आभार मानले.
COMMENTS