पुणेः पुणे शहरात जबरी चोरी करणा-या आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. १९/...
पुणेः पुणे शहरात जबरी चोरी करणा-या आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
१९/०५/२०२२ रोजी रात्री येरवडा येथून फिर्यादी हे घरी जात होती. मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी फिर्यादी यांना अडवून, मारहाण करुन खिशातील मोबाईल फोन व पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत येरवडा पो स्टे गु र नं २३० / २०२२ भादवि ३४१, ३९४, ५०४, ३४ गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी तपास पथकाला सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकातील पोलिस अंमलदार यांनी बातमीदारांना सांगून आरोपींचा माग काढून आरोपी निष्पन्न केले.
सदर गुन्हयातील आरोपी हे हडपसर येथे असल्याची बातमी तपास पथकातील पोलिस अंमलदार किरण घुटे, दत्ता शिंदे, तुषार खराडे यांना समजताच तपास पथकाचे पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफौ प्रदिप सुर्वे, पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, अनिल शिंदे यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून सदर आरोपींना पळून जात असताना पकडले. १) साजीद दिलावर सय्यद (वय २१), २) राजन रघुनाथ लावंड (वय २०), ३) ओम विनोद भंडारी (वय २१, तिघेही रा. माळवाडी, हडपसर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्हयात चोरीस गेलेला १५,०००/-रु. किंमतीचा मोबाईल गुन्हयात वापरलेली ४०,०००/- रु किंमतीची मोटारसायकल असा एकूण ५५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनि दर्शना शेलार करत आहेत.
सदरची कामगिरी रोहिदास पवार, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ - ४ किशोर जाधव सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, उत्तम चक्रे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफौ प्रदिप सुर्वे, पोहवा दत्ता शिंदे, गणपत थिकोळे, पोना तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, गणेश वाघ पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी यांनी केली आहे.
COMMENTS