पुणे: पुणे-सातारा रस्त्यावरील शितल लॉजमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवतीचा (वय २४) मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. युवती रात्री त...
पुणे: पुणे-सातारा रस्त्यावरील शितल लॉजमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवतीचा (वय २४) मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. युवती रात्री तिच्या प्रियकरासोबत लॉजवर आली होती.
सकाळी सफाई कामगार सफाई करत असताना हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिप्ती काटमोडे असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. युवती व तिचा प्रियकर दोघे रात्री लॉजवर आले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे लॉजचा कामगार साफसफाई करत असताना त्याला बाथरूममध्ये युवतीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. हा प्रकार ताबडतोब पोलिसांना कळविण्यात आला.
भारती विद्यापीठ पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर युवतीचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पसार झालेल्या तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS