नागपूर : पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी बेकायदेशीरपणे सुरू असणारी रेव्ह पार्टी उधळली असून , घटनास्थळावरून मोठ्या प्रमानात मद्य...
नागपूर : पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी बेकायदेशीरपणे सुरू असणारी रेव्ह पार्टी उधळली असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमानात मद्यसाठा जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास करत आहेत.
एकीकडे नागरिक
पारंपरिक पर्यटनस्थळांच्या वाऱ्या करू लागल्या असताना कोरड्या विदर्भात
रेव्हपार्टीसाठी मुंबई-पुण्यासह देशभरातून मद्यप्रेमींची जत्रा जमल्याचे नागपूर
नजीकच हिंगणा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका फार्म हाऊसवरील कारवाईतून उघड झाले.
येथील हिंगणा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खरसमारी गावाजवळील प्रशस्त गिरनार
फार्महाऊसजवळ रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस उपायुक्त परीमंडळ ३
गजानन शिवलिंग राजमाने यांना रात्री शहर गस्ती दरम्यान मिळाली होती. रविवारी
मध्यरात्री त्यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकला. त्यात कर्णकर्कश संगीताच्या
तालावर नशेत तरुण-तरुणी नृत्य करताना आढळले तसेच कोटय़वधीचा खर्च करण्यात आलेल्या
पार्टीवर झालेल्या कारवाईनंतर हा सारा प्रकार राजरोसपणे कसा सुरू होता, याची चर्चा मंगळवारी
संपूर्ण शहरात रंगली होती.
युवक कॉंग्रेसचा
प्रदेश सरचिटणीस सईश वारजूरकर हा चंद्रपूरचा रहिवासी आहे. त्याने ही पार्टी आयोजित
केली होती. पार्टीसाठी १० दिवसांपासून समाजमाध्यमांवर जाहिरात केली जात होती. तसेच
पार्टीसाठी ग्रामपंचायत, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती.
मात्र ती उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. या पार्टीत पुणे, मुंबईसारख्या शहरातून
शेकडो तर इतर भागातून अंदाजे तीन हजार तरुण-तरुणी गिरनार फार्महाऊसमध्ये आले होते.
त्यांच्यासाठी सहआयोजक छगन कुवजीभाई पटेल (वय ६५) आणि शिव वडेट्टीवार (वय ३२)
रहाटे कॉलनी यांनी महागडी विदेशी दारू आणि अन्य अंमली पदार्थाची व्यवस्था केली
असल्याची माहीती समोर आली आहे. पोलिसांनी या पार्टीतून मोठय़ा प्रमाणात दारू, डीजे साहित्य, एलएडी असा १० लाख ४५
हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी छगन पटेल आणि शिव वडेट्टीवर
यांच्यासह १० जनांवर गुन्हा दाखल केला आहे.
युवक कॉंग्रेसचे
प्रदेश सरचिटणीस साईश वारजूरकर याने जामठा-खरसमारी गावाजवळील गिरनार
फार्महाऊसमध्ये आयोजित केलेल्या 'रेव्ह पार्टी 'ची समाजमाध्यमांवर जाहिरात करण्यात आली होती व त्यात सहभागी होण्यासाठी
राज्यभरातील तरुण-तरुणी नागपुरात आल्या होत्या. पार्टीत विदेशी मद्याची व्यवस्था
करण्यात आली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलिसांनी कारवाई करून ही रेव्हपार्टी
उधळून लावली. पोलिसांना मध्यरात्री रेव्ह पार्टीची माहिती मिळाली. छापा पडल्यानंतर
पार्टीत एकच गोंधळ उडाला. तरुण-तरुणींनी दिसेल त्या मार्गाने पळ काढला. अनेकांनी
विमानतळाच्या दिशेने धाव घेत पुणे-मुंबई गाठण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
COMMENTS