सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे (बांगरवा...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील १० विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्या मध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये ही निवड करण्यात आली.
आरती सरोदे या विद्यार्थिनीची प्रोफाऊंड एज्युटेक प्रा.लि.पुणे येथे ट्रेनी इंजिनियर म्हणून निवड झाली.सदर विद्यार्थिनीला वार्षिक ५ लाखाचे पॅकेज देण्यात येणार असल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.प्रवीण सातपुते यांनी दिली.
जयेश जाधव या विद्यार्थ्याची शापूर्जी पोलोनजी अँड कंपनी प्रा.लि.या कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शन इंजिनियर म्हणून ४.२० लाख वार्षिक पॅकेजवर निवड करण्यात आली.
ओंकार थोरात याची इन्फोसिस प्रा.लि.मध्ये सिस्टीम इंजिनियर म्हणून ३.६० लाख वार्षिक पॅकेजद्वारे निवड करण्यात आली.
साईनाथ कुरकुटे या विद्यार्थ्याची टाटा कॅन्सल्टिंग इंजिनियर्स लि.या कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनियर कन्सल्टन्ट म्हणून निवड करण्यात आली.
जेनेसीस इंटरनॅशनल कार्पोरेशन लि.मुंबई या कंपनीमध्ये शाहरुख सय्यद व प्रत्युष सिंग या दोघांची निवड झाली.चेन्नई आणि दिल्ली मध्ये वाहतूक महामार्गाचे गुगल मॅप अपडेशन करण्याचे काम हे विद्यार्थी करणार असल्याचे प्रा.अमोल भोर यांनी सांगितले.
विशाल शिंदे,मयूर गुंजाळ व प्रसाद बिचारे या विद्यार्थ्याची मातोश्री इंटेरियर या कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून निवड करण्यात आली.
रघुवीर चौहान या विद्यार्थ्याची जातवेदास कन्स्ट्रक्शन प्रा.लि.या कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनियर या पदावर निवड झाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग या पदवी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि फिल्ड वर्क विषयीची माहिती या संदर्भात प्रात्यक्षिके असतात.तसेच इंडस्ट्रीयल व्हिजिट,कार्यशाळा,तज्ञ मार्गदर्शन वर्ग,सॉफ्ट स्किल,संभाषण कौशल्ये इ प्रकारच्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकता व विकास याचे धडे दिले जातात.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधी निर्माण तर होतातच पण त्याचबरोबर रोजगारक्षम व कार्पोरेट स्किल देखील वृद्धिंगत होतात.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS