ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार झाल्यामुळे, या पावसामुळे खरं तर नदीकाठच्या ...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार झाल्यामुळे, या पावसामुळे खरं तर नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीच्या महापूराचे पाणी घुसल्यामुळे शेतातील शेतीचे व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये सोयाबीन, भूईमुग व भातपिकांचे
नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम
भागातील नदीकाठावरील राळेगण, शिंदे, आपटाळे, सोनावळे व इतरही गावांतील
शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जुन्नर तालुक्याच्या पश्चम भागातील राळेगण
येथील विठ्ठल शिवराम उंडे या शेतकऱ्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तरी कृषी
विभाग जुन्नर यांनी तातडीने या ठिकाणच्या परिस्थितीचे पंचनामे करून सदर शेतकऱ्याला
न्याय मिळवून द्यावा, अशीच या शेतकऱ्याकडून मागणी होत आहे.
COMMENTS