पुणे : क्लिनिकमध्ये उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका युवतीवर (वय १९) डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित डॉक्टर व...
पुणे : क्लिनिकमध्ये उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका युवतीवर (वय १९) डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
डॉ. योगेश लक्ष्मण वाल्हे (वय 45, अमोल एनक्लेव्ह, कोटकर लेन भाऊ पाटील रोड, औंध) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत घडला आहे.
डॉक्टरने तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.
कोथरूड परिसरातील पौड रस्त्यावर डॉ. योगेश वाल्हे यांचे क्लिनिक आहे. युवती मणक्याच्या आजाराचे उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी आली होती. युवती अल्पवयीन असल्याची माहित असतानाही संबंधित डॉक्टरने उपचार करण्याच्या पाहण्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला. संबंधित डॉक्टर आरोपीने फिर्यादीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढले आणि याविषयी कोणाला काही सांगितल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान, युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS