पाटणा (बिहार): बिहारमधील जमुई जिल्ह्यातील दोन मुलांची आई दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघे एक...
पाटणा (बिहार): बिहारमधील जमुई जिल्ह्यातील दोन मुलांची आई दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघे एकमेकांच्या संपर्कामध्ये आले होते.
संबंधित प्रेमप्रकरणाची परिसरासह सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस वाढत चालले होते. महिलेने मुलाला आपल्या घरी बोलावून घेतले आणि हा मुलगा आमच्या माहेरचा असल्याचे सांगत त्याला घरामध्ये ठेवले. पण, दोघांना रात्रीच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर नवरा चिडला. दोघांनाही गावातील मंदिरासमोर उभे करून रक्तबंभाळ होईपर्यंत मारले. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, महिला मुलाला आपल्या कुशीमध्ये घेऊन त्याला वाचवताना दिसत आहे. दुसरीकडे तिचा नवरा आणि गावकरी तिला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत आहेत. याची माहिती मिळताच मुख्याधिकारी आणि घटनास्थळी पोहोचलेल्या इतर ज्येष्ठ नागरिकांच्या मधस्थीने प्रकार शांत झाले. यानंतर मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात सोपवण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS