लेखक : प्रा. शरद मनसुख, जुन्नर मो नं . 9890266713 क्राईमनामा Live : MPSC, UPSC, NGO, BSW/MSW, शासकिय सेवा व सरळ सेवा भरती, प्रसार माध्यमे,...
लेखक : प्रा. शरद मनसुख, जुन्नर मो नं . 9890266713
क्राईमनामा Live : MPSC, UPSC, NGO, BSW/MSW, शासकिय सेवा व सरळ सेवा भरती, प्रसार माध्यमे, कायदे / विधी विभाग, शिक्षण व आरोग्य, ग्रामीण विकास क्षेत्र, परराष्ट्र खाते, कमर्शियल आर्ट, पर्यटन क्षेत्र, पुरातत्व विभाग, जाहिराती, विमाक्षेत्र व राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास व भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी इ. स्पेशल विषयासाठी विविध करिअर संधी उपलब्ध आहेत.
कला शाखेतील करिअर संधी - साधारण पणे कला , वाणिज्य व विज्ञान या पारंपारीक विद्या शाखांमध्ये करिअर करण्यासाठी खूप संधी असते. मात्र समाजात विशेषता पालक वर्गामध्ये पूर्वीपासून प्रत्येक शाखेविषयी माहिती अतिशय कमी प्रमाणात आहे . कला शाखा म्हटले की डी.एड् किंवा बी.एड् करून फक्त मास्तर अर्थात शिक्षण क्षेत्रात शिक्षक होता येते. व वाणिज्य शाखा मध्ये बँकेत नोकरी करणारेच प्रवेश घेतात तसेच विज्ञान शाखा म्हटले की वैद्यकिय, इंजिनिअरींग क्षेत्रात करिअर करणाऱ्यांनीच प्रवेश घ्यावा . हा मूळ दृष्टिकोन बाजूला ठेऊन या वरील पारंपारीक शाखेत विविध वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भरपूर संधी आहे .
करिअर म्हणजे एक बुद्धिवान व कौशल्यवान व्यक्ती बनून आपल्या आवडी व मार्केट मधील गरजांचा अंदाज घेऊन आपली सर्वोत्तम क्षमता सिद्ध करणे होय ." करिअर निवडीसाठी महत्वाच्या तीन घटक आवश्यक असतात. त्यामध्ये प्रथम महत्वाचा घटक म्हणजे आवड होय. आवड म्हणजे तुम्हाला कोणता क्षेत्रात कार्य करण्याची मनापासून इच्छा आहे . आवड असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात उत्तम कार्य करू शकता. तसेच दुसरा महत्वाचा घटक म्हणजे क्षमता होय. एखाद्या पदासाठी किंवा क्षेत्रासाठी कार्य करण्याची सर्वोत्तम क्षमता आपल्यामध्ये असणे फार गरजेचे आहे आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पात्रता होय. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी पणे वाटचाल करण्यासाठी खूप आवश्यक असते ती म्हणजे पात्रता वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी व करिअरसाठी पात्रता हा अत्यंत महत्वाचा निकष मानला जातो. उमेदवारांनी नियमानुसार पात्रता पूर्ण केली तरच तो निश्चित ध्येय गाठू शकतो. ते पद प्राप्त करू शकतो.
स्वामी विवेकानंद युवा पिढीला ध्येय प्राप्ती साठी मार्गदर्शन करताना म्हणतात की " पक्का निर्धार आणि निश्चिंत दिशा असल्यास कोणतेही खडतर आव्हान व ध्येय निश्चित गाठता येते."
दहावी नंतर कला शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बारावी तसेच बीए पदवी प्राप्त केल्या नंतर विविध क्षेत्रात कला शाखेतील विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत . विशेषता स्पर्धा परीक्षेची आवड असणारे विद्यार्थी हे MPSC द्वारे
पोलिस उपनिरिक्षक ( PSI), विक्रीकर अधिकारी (STI), मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसिलदार व तहसिलदार, शिक्षणाधिकारी, पोलिस उपअधिक्षक, उपजिल्हाधिकारी अशी विविध पदे महाराष्टू लोकसेवा आयोगातर्फे आयोजित परिक्षेतून प्राप्त करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना केंद्रिय लोकसेवा आयोगाचे विविध पदाचे आकर्षण आहे ते
UPSC द्वारे IAS, IPS, IFS तसेच अन्य भारतीय केंद्रिय सेवेची निवड करू शकतात. तसेच स्वयंसेवे संस्था अर्थात
NGO मध्ये कार्य करण्याची आवड असणाऱ्या साठी खाजगीक्षेत्र, निमशासकिय क्षेत्र , मानव अधिकार क्षेत्र (Human Right) इत्यादी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. व समाजसेवेची मनापासून आवड असणारे उमेदवार BSW/MSW या सारखे विविध कोर्स व पदवी घेऊन शासकिय व निमशासकिय क्षेत्र, खाजगी कंपनी क्षेत्रात कार्य करून समाधान प्राप्त करू शकतात. आणि महाराष्ट्र शासन व भारत सरकार मार्फत विविध विभागातून सरळसेवा भरतीद्वारे आर्मी, पोलिस, अग्निशामक दल, BSF / SRPF / CRPF / NDRF या विभागात काम करण्याची संधी प्राप्त करू शकतात . तसेच आजच्या आधुनिक व धावपळीच्या युगात प्रसारमाध्यमात कार्य करू इच्छिणार्यांना प्रिंट मिडिया अर्थात वर्तमान पत्रासाठी वार्ताहर व इलेक्ट्रॉनिक मिडिया म्हणजे टी.व्ही, विविध न्यूज चॅनेलसाठी रिपोर्टर किंवा पत्रकार म्हणून कार्य करू शकता. राजकिय, आर्थिक, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील पत्रकार म्हणून विशेष संधी आहे. विधी व कायदा, न्यायालयाशी संबधित विभागात
LLB किंवा LLM पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेऊन वकिली क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू शकता व न्यायाधीश पदापर्यत पोहचू शकता व खाजगी क्षेत्रात कायदेशीर सल्लागार म्हणून वेगवेगळ्या कंपन्या मध्ये संधी प्राप्त करणे सहज सोपे आहे. व ज्ञान दानाच्या पवित्र क्षेत्रात अर्थात शिक्षणक्षेत्रात प्राथमिक शिक्षकासाठी बारावी नंतर डी एड् आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी B.A, किंवा M.A नंतर बी.एड् करून माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज साठी संधी मिळू शकते तसेच सिनिअर कॉलेज मध्ये प्राध्यापक होण्यासाठी सेट व नेट या राज्य व राष्ट्रीय पात्रता परिक्षा पास होऊन किंवा पी.एच.डी पदवी प्राप्त करून करिअर करता येते.
केंद्रशासनाच्या परराष्ट्र खात्यांमध्ये भाषातज्ञ, परकीय भाषातज्ञ, भाषा अनुवादक म्हणून कार्य करण्याची संधी आहे. विशेषता मराठी व हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व निरिक्षण, कल्पना विस्तार यांची आवड असलेल्या नवोदित लेखकांना कथा, पटकथा, संवाद लेखक, विनोदी लेखक व दैनदिन मालिका, चित्रपट व वेबसिरिज, ओटीटी मध्ये लेखनाच्या अनेक संधी या डिजिटल युगात नव्याने उपलब्ध झालेल्या आहेत.
ग्रामीण विकास क्षेत्रात विशेषता ग्रामीण भागांशी निगडीत असणारे विविध शासकिय पदे या मध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवक, वनरक्षक, पाटबंधारे, समाजकल्याण विभाग इत्यादी. चित्रकलेची आवड असणाऱ्या उमेदवारांस कमर्शियल आर्ट मध्ये BFA, MFA,फाईन आर्ट, अनिमेशन, ग्राफिक्स्, व्यंगचित्रकार म्हणून उत्तम संधी आहे. आजच्या युगात पर्यटनास असाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या भागात पर्यटन क्षेत्रात गाईड , मार्गदशक, ट्रॅव्हल्स् ॲण्ड टुर्स करिता चांगली संधी दिसून येते. व हजारो वर्षाची परंपरा व इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रात व भारतात पुरातत्वशास्त्र व विभागात उत्खनन, हेरिटेज क्षेत्र, संशोधन क्षेत्र, इतिहास संशोधक म्हणून करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. आणि सध्या जाहिरातीचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात छोटे, मोठे व्यवसायापासून ते प्रत्येक उत्पादन व वस्तूसाठी जाहिरात ही करावीच लागते व ती आवश्यक असते. या
जाहिरात क्षेत्रात खास करून जाहिरात लेखक, सल्लागार, संकल्पना तज्ञ, प्रकल्प सहायक, मॉडेलिंग क्षेत्र मध्ये अशा विविध संधी उपलब्ध आहेत. राज्यशास्त्र स्पेशल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षे बरोबरच पॉलिटिकल सायंटिस्ट व राजकीय समालोचक, सर्वे कंडक्टर, राजकीय विश्लेषक, राजकीय पत्रकार यासाठी करिअर उपलब्ध आहेत . मानसशास्त्र विषय स्पेशल करून चाईल्ड सायकॉलॉजी, क्रिमिनल सायकॉलॉजी, समुपदेशक, कॉन्सेलिंग क्षेत्र तसेच भूगोल विषयात जिओमॅपिंग, हवामान, भूकंप, GIS, समुद्री अभ्यास क्षेत्रात वेगवेगळ्या संधी असतात .
सरकारी नोकरीची अपेक्षा असणाऱ्या तरुणांना विविध शासकिय सेवा त्यामध्ये आरोग्य, ग्रामविकास विभाग, पोस्ट, समाजकल्याण, पाटबंधारे विभाग, महानगर पालिकेत मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी आहे. विमाक्षेत्रात LIC, शासकीय व खाजगी क्षेत्रात विमा सल्लागार, एजंट आणि विकास अधिकारी म्हणून करिअर करता येते.
COMMENTS