सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : बेल्हे येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगर...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : बेल्हे येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल मार्फत नुकत्याच आयोजित केलेल्या "पूल कॅम्पस ड्राईव्ह २०२२" अंतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील २० विद्यार्थ्यांची फुकोकू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या चाकण पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
फुकोकू हि एक जपानी कंपनी असून रबर,मेटल सिंथेटीक रेजिन, सिरॅमिक, मेडिकल उपकरणे तसेच अनेकविध बायो-मेडिकल प्रोडक्ट चे मॅन्यूफॅक्चरिंग व सेल या कंपनीमार्फत केले जाते.
संभाषण कौशल्य, सॉफ्ट स्किल, सामान्य ज्ञान, विषयाबाबतचे तांत्रिक ज्ञान व तत्सम सॉफ्टवेअर विषयीची अद्ययावत माहिती तसेच प्रात्यक्षिक व व्यावहारिक कौशल्ये या सर्व बाबींचा विचार निवड चाचणीमध्ये केलेला आहे असे यावेळी कंपनीचे सिनिअर मॅनेजर पराग जठार म्हणाले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे:
स्वस्तिक आभाळे, प्रज्वल खराडे, प्रसाद घोलप, अभिषेक तांबे, आशिष खटाटे, आयुष कोरडे, ऋषिकेश डोके, घनश्याम फुले, सुरज खराडे, नवनाथ झावरे, संकेत थोरात, प्रदीप तांबे, शुभम टेमगिरे,फैसल मोमीन, आशुतोष खैरे, केशव म्हात्रे, सिद्धेश तांबे, सिद्धार्थ गायखे, मयूर गाडगे, वल्लभ गाडगे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
एच आर दिपक कुलकर्णी व सिनिअर मॅनेजर पराग जठार यांनी निवड प्रक्रिया राबवली. या उपक्रमासाठी प्रा.महेंद्र खटाटे, प्रा.संजय कंधारे, प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा.संकेत विघे, प्रा.हुसेन मोमीन, आदींनी परिश्रम घेतले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले.
COMMENTS