आंबेगाव: मंचर (ता. आंबेगाव) येथील बिअरबार हॉटेल व्यवसायिकास जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकर...
आंबेगाव: मंचर (ता. आंबेगाव) येथील बिअरबार हॉटेल व्यवसायिकास जीवे
मारण्याची धमकी देत त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी हरीश
महादू कानसकर (रांजणी ता.
मंगेश मधुकर काळे (वय
४१ रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे) यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे. हरीश कानसकर त्याच्यावर
मंचर पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असून, सध्या तो जामिनावर बाहेर आहे. पूर्वी
त्याच्यावर तक्रार दिल्याचा राग धरून धमकी दिल्याप्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार
करण्यात आली आहे.
फिर्यादी मंगेश काळे
हॉटेल व्यवसायिक आहे. त्यांची मंचर मध्ये बिअर शॉपी आहे. फिर्यादीने यापूर्वी हरीश
कानसकर याच्या विरोधात ८/२/२०२१ रोजी मंचर पोलिस स्टेशन मध्ये गु. र. नं.७८/२०२१
भा.द.वि.कलम ३८४,३८५,५०४,३४ अन्वये तक्रार दिलेली होती. त्यावेळी हरीश कानसकर याला अटक झालेली होती.
कारागृहातून सुटून आल्यानंतर हॉटेलवर जाऊन माझ्या विरोधात तक्रार का दिली? या कारणावरून पाच लाख
रुपयांची खंडणी मागितली, नाही दिल्यास हॉटेल बंद करून टाकीन,
अशी धमकी दिली. पुढील तपास अंमलदार सपोनि भालेकर करत आहेत.
COMMENTS