लेखक .अँड .महेंद्र गुंजाळ - 7798059921. गरीब कुटुंबात जन्माला येऊन उच्च शिक्षण घेणे हे किती अवघड असते. शिक्षण घेताना आलेल्या अनेक अडचणी याव...
लेखक .अँड .महेंद्र गुंजाळ - 7798059921.
गरीब कुटुंबात जन्माला येऊन उच्च शिक्षण घेणे हे किती अवघड असते. शिक्षण घेताना आलेल्या अनेक अडचणी यावर मात करून स्वतःचे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण प्राप्त करून देखील परत नोकरीसाठी होणारी वशिलेबाजी व जातियता यामुळे येणारा संताप, आपण या आत्मचरित्रात खूप छान व्यक्त केले आहे. नेहमीप्रमाणे आपण अंधश्रद्धेवर ह्या आत्मचरित्रात पण आघात केलेली दिसून येते. पाच वर्षाचा अयप्पा जेंव्हा आजारी पडतो त्यावेळी त्याचे आई- वडील त्याला डॉक्टर कडे घेऊन जायचं सोडून सटवाई देवीला नवस करून बोकडाची बळी देतो आणि नालायक समाजाला खायाला घालतो. बोकडाची बळी देण्यापूर्वी त्याच्यावरती हळद कुंकू लावुन, पाणी शिंपडून व पाया पडून( जसं की बोकडच आता देवी आहे) अयप्पा बरा होउदे आसा कौल मागतात पण आपेक्षीत कौल नाही भेटल्याने सर्व समाज नाराज होते व त्यांचा नेता परत बोकडावर ज्यास्त पाणी शिंपडून कौल मागतो मग वल्लचिंब झालेला बोकड आंग झटकतो. मग काय सगलीकडे जल्लोष व देवीच्या नावाचे जय जय कार. दोन मिनिटांपूर्वी ज्या बोकडाचे पाया पडत होते त्या बोकडाचे आता तर बली जाणार होत व पूर्ण समाज जल्लोष साजरा करत होता कारण त्यांना मटन खायाला भेटणार होता. त्या समाजाला अयप्पाशी काही देणं-घेणं नव्हतं त्यांना फक्त मटन खायाला पाहिजे होता. बोकड कापण्यापेक्षा त्याच किंमती इतके पैसे दवाखान्यात खर्च केला असता किंवा फुुकट गोरमेंट दवाखान्यात इलाज केला असता तर कदाचित अयप्पा वाचला असता. पण त्याचे व त्यांच्या आई-वडिलांचे दुर्दैवी म्हणावे जे नवस पुर्ण करून देखील अयप्पा दगावला.बोकड किंवा कोंबडा यांना बळी देतात कारण त्याचं मांस नंतर, मिटक्या मारीत चापून खाता येतं, वाघाचं खाता येणार नाही.
देवपूजेनंतर देवाला, माणसाला खाण्यायोग्य नाही, अशा अन्नाचा नैवेद्य, कधीतरी दाखविला जातो का?
गणपतीबाप्पाला मोदक आवडतात हे त्यानं सांगितलं का? नाही. मोदक ज्याला आवडतात अशा कोण्या अेका माणसानं हे ठरविलं, आजुबाजुच्या व्यक्तींना ते सांगितलं, त्यांना ते भावलं आणि ही परंपरा सुरू झाली … अजुनही चालू आहे.
पूजेची आणि नैवेद्याची साधनसामुग्री, परिसरात अुपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीवरच अवलंबून असते. कोकणात, तांदुळाचं पीठ वापरून केलेल्या अुकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवितात तर विदर्भात, गव्हाची कणीक वापरून केलेल्या तळणीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवितात.
अशारितीनं, जेव्हा अेखादी परंपरा रूढ होते तेव्हा ती नवीनच असते. कालबाह्य परंपरा सोडाव्यात, कालसुसंगत परंपरा पाळाव्यात. अुत्क्रांती हे वास्तव आहे. नागपंचमी सणाचे जे तुम्ही वर्णन केलेले आहे ते वाचताना डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना दीड रुपया वाचवण्यासाठी संगमनेर ते डोळासणे प्रवास पायी जाता. घरी गेल्यानंतर दारिद्र्यामुळे घरी नागपंचमी न करता बसलेली आई वडील मुलाला बघून खूप आनंदित होतात. वडीलांच्याकडे पैसे नसतात तरी पण दुकानातून उधारी आणून नागपंचमी साजरा करतात. आपल्या मुलाला गोडधोड खायाला घालण्यासाठी आई-वडिलांची तळमळ दिसून येते. नोकरी साठी अनेक ठिकाणी अर्ज भरणे इंटरव्यू देणे व शेवटी हाताश होऊन दुसऱ्या संधीची वाट पाहणे परत तेच नैराश्य. पण तुम्ही जिद्द सोडले नाही शेवटी चांगली नोकरी मिळवता हे आमच्यासारख्या तरुण पिढीला एक आदर्श आहे. चांगली नोकरी भेटल्यानंतर तुम्ही समाज कल्याणाची अनेक कामे करतात.. त्यामुळे सर्व वंचित समाज त्यांना न्याय दिल्यामुळे तुमचे ऋणी आहेत...
COMMENTS