पुणे: करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्य...
पुणे: करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, याबाबत पुढील तपास करत आहेत.
करंदी (ता.
शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती
सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिस पाटील वंदना
साबळे पाटील, पोलिस हवालदार
सचिन मोरे यांनी सदर ठिकाणी धाव घेत कोंडीबा साबळे, संभाजी पांगरकर, बाळासाहेब नप्ते, विशाल नप्ते, मोरेश्वर साकोरे, आप्पासाहेब वर्पे, नागू माने यांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्याबाहेर काढला.
सदर मृतदेहाची ओळख पटली नसून अंदाजे ३५ ते चाळीस वर्षे वयोगटातील पुरुष असून, त्याच्या अंगात काळ्या रंगाची प्यांट असे वर्णन आढळून आले आहे. याबाबत पोलिस पाटील वंदना महेश साबळे (वय ४१ वर्षे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहेत.
COMMENTS