कराची (पाकिस्तान): पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह सहा मुलांसमोरच कढईत उकळल्याची धक्कादायक घटना गुलशन-ए-इक्बाल या भागात घडली आहे. पोलिसांन...
कराची (पाकिस्तान): पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह सहा मुलांसमोरच कढईत उकळल्याची धक्कादायक घटना गुलशन-ए-इक्बाल या भागात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिसांना नर्गिस नावाच्या महिलेचा मृतदेह एका खाजगी शाळेच्या स्वयंपाकघरात एका कढईत आढळला होता. आरोपी पती हा त्याच्या पत्नीला इतर पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. मात्र, पत्नीने त्यास नकार दिल्याने पतीने तिचा खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्गिसचा पती आशिक हा बाजौर एजन्सी येथील रहिवासी असून, तो शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता. आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळेतील नोकर क्वार्टरमध्ये राहत होता. हत्या झाल्यानंतर नर्गिसच्या 15 वर्षांच्या मुलीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी आशिक हा आपल्या तीन मुलांसह फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आशिकचा शोध सुरू केला आहे. इतर तीन मुले अत्यंत घाबरली असून आणि त्यांना मोठा धक्का बसला आहे.
घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुलांच्या जबाबावरून असे कळून आले आहे की आरोपीने आपल्या पत्नीला कढईत उकळण्यापूर्वी तिचा उशीने गळा दाबला. महिलेचा एक पायही तिच्या शरीरापासून वेगळा झालेला आढळून आला. आशिकने नर्गिसला इतर पुरुषांशी अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि तिने तसे करण्यास नकार दिल्यावर त्याने तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
COMMENTS