पुणे : कुरकुंभ (ता. दौंड) येथे पुणे-सोलापुर महामार्गावर मळद तलावाच्या समोर असलेल्या शेतात सतरा वर्ष मुलीचा गळा चिरून मारण्याचा प्रयत्न करण...
पुणे : कुरकुंभ (ता. दौंड) येथे पुणे-सोलापुर महामार्गावर मळद तलावाच्या समोर असलेल्या शेतात सतरा वर्ष मुलीचा गळा चिरून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.
युवती गंभीर स्वरूपात जखमी झाली असून, उपचारासाठी तिला दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आरोपीने लग्नासाठी प्रतीसाद मिळत नसल्याच्या कारणातून हे पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी राहुल श्रीशैल निरजे (वय 27) याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS