उस्मानाबाद: मुरुम येथे एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (ता. १५) दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या वेळी ११ जुग...
उस्मानाबाद: मुरुम येथे एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (ता. १५) दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या वेळी ११ जुगारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, ११ लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंदयांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. १५ जुलै रोजी गस्तीस होते. दरम्यान स्था.गु.शा. चे पोनि श्री रामेश्वर खनाळ यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली कि , मुरुम गावातील ग्रामस्थ दिलीप शेळके यांचे शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. यावर पथकाने सदर ठिकाणी १५.३० वा.चे सुमारास छापा टाकला असता तेथे दिलीप शेळके यांसह १. विश्वनाथ जगदाळे २. प्रकाश मांडवे ३ लतीफ सरनोबत, तीघे रा. कसगी ४. सुधाकर नारायणकर ५. सुरेश राठोड ६. संजय घुमरे, तीघे रा. मुरुम ७. गोविंद दंडगुले ८. नितेश देशपांडे , दोघे रा. सालेगाव ९. बसवराज ओमशेट्टे, रा. आलुर १०. मोहन चव्हाण, रा. आष्टाकासार ११. व्यंकट घुरघुरे, रा. वरनाळ हे सर्व लोक तिर्रट नावाचा जुगार खेळताना मिळुन आले. त्यांच्याकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर पत्र्याच्या शेडचे मालक दिलीप शेळके हेच जुगाराचा अडडा चालवित असल्याची माहिती प्राप्त झाली.
या वेळी त्यांचेकडुन जुगाराचे साहित्यासह ०७ मोटारसायकल, ०१ कार, १० मोबाईल व २९, ५०० रुपये रोख रक्कम असा एकुण ११,३४,५०० रु किंचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला असुन त्यांचेविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४,५ अंतर्गत मुरुम पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि - रामेश्वर खनाळ, सपोनि - मनोज निलंगेकर, पोहेकॉ - जावेद काझी, हुसेन सय्यद, सुभाष चौरे, मेहबुब अरब, पोना - शौकत पठाण , अमोल चव्हाण, अजित कवडे, नितिन जाधवर, भालचंद्र काकडे, पोकॉ - रविंद्र आरसेवाड, बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS