सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र जुन्नर परशुराम सेवा संघ यांच्या संयुक्त ...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र जुन्नर परशुराम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शनिवार दिनांक २३ जुलै २०२२ रोजी जुन्नर येथील महादेव गार्डन मंगल कार्यालय येथे सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री.चारुदत्त गोविंदस्वामी आफळे महाराज यांचे जीवनावर आधारित हिंदवी स्वराज्याची जन्मभूमी या विषयावर कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
प्रतिमापूजन, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली प्रसंगी प्रमुख पाहुणे तहसीलदार रवींद्र सबनीस साहेब, प्रसाद रानडे साहेब,संस्था कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी,उपाध्यक्ष चंद्रशेखर गाजरे,जुन्नर केंद्र प्रमुख हरिष भवाळकर,मुकुंद राक्षे, शशी समुद्र,संतोष कुलकर्णी,जितेंद्र पुराणिक,वैभव कुलकर्णी,शिल्पा भिडे आणि संस्थेचे नाशिक,पुणे,लोणंद,निरा,फलटण,नारायणगांव,ओतूर तसेच परशुराम पुरोहित संघ जुन्नर तालुका,ईश्वर पुरोहित संघ,परशुराम सेवा संघ,परशुराम भगिनी सेवा संघ,परशुराम युवा संघ तसेच सर्व बंधू - भगिनी, वारकरी सांप्रदाय, पदाधिकारी व शिक्षकेतर वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष चंद्रशेखर गाजरे यांनी केले तर सुत्रसंचलन प्राध्यापक महाजन सर यांनी केले आणि आभार सचिव नितीन गाजरे यांनी मानले.
COMMENTS