लेखक : डॉ उत्तमराव शेलार ( प्र.प्राचार्य ) सहकारमहर्षी आदरणीय दादासाहेब काळे यांच्या आदर्श पालकनितींचे बोट धरुन उदयास आलेले स्पष्ट ध्येय आ...
लेखक : डॉ उत्तमराव शेलार ( प्र.प्राचार्य )
सहकारमहर्षी आदरणीय दादासाहेब काळे यांच्या आदर्श पालकनितींचे बोट धरुन उदयास आलेले स्पष्ट ध्येय आणि धडक वृत्तीचे नेतृत्व ॲड. संजयराव शिवाजीराव काळे साहेब यांनी सन २००७ पासून जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ, जुन्नर संस्थेची धुरा आपल्या खांदयांवर समर्थपणे पेलली आणि संस्थेच्या उज्वल आणि नेत्रदिपक यशाचा प्रवास सुरु झाला. साहेबांच्या दूरदृष्टीतून भविष्यातील बदलांचा वेध घेत श्री शिव छत्रपती महाविद्यालय हे शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य केंद्र बनले आहे. साहेबांच्या मार्गदर्शनातून 'उत्कृष्ट महाविद्यालय 'ग्रामीण विभाग पारितोषिक तसेच विदयापीठ अनुदान आयोगाकडून सर्वाेत्कृष्ठतेचे क्षमताधिष्ठित महाविद्यालय (सी.पी.ई) आणि नॅक मुल्यांकीत बी+ दर्जा प्राप्त असणारे महाविद्यालय हे जुन्नर सारख्या ग्रामीण भागातील एकमेव महाविद्यालय आहे. केंब्रीज विद्यापीठातून एल.एल.एम. पदवी प्राप्त केल्यानंतर परदेशाप्रमाणे आपली शिक्षण व्यवस्था असावी असा आग्रह धरणारे आमचे साहेब हे नेहमीच विदयार्थ्यांना गुणवत्ता, कला, क्रिडा, आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देत असतात. फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेत असतात. आणि त्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. केवळ त्यामुळेच आज श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आदराने घेतले जाते. साहेबांच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या भौतिक आणि शैक्षणिक प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचा-यांना दिलेले कामातील स्वातंत्र्य, चांगल्या कामाबदद्ल नियमित होणारे कौतुक व प्रोत्साहन यामुळे सर्वजण महाविद्यालयासाठी जीव ओतून काम करत असतात. जुन्नर सारख्या दुर्गम भागामध्ये इन्डोअर स्पोर्ट्स हाॅल आणि माॅर्डन इन्फ्रास्ट्रक्चर असणारे श्री शिव छत्रपती महाविद्यालय हे पुणे ग्रामीण भागातील एकमेवाद्वित्तीय महाविद्यालय आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना डीजीटल क्लासरुम्स, ऑडीओ-व्हिज्वल क्लासेस, इ-लर्निंगची सुविधा आणि प्रशस्त काॅम्पुटर लॅब्स असणारे महाविद्यालय म्हणून असलेली महाविद्यालयाची ओळख ही फक्त साहेबांच्या दुरदृष्टीने मिळालेली आहे. बी.बी.ए., बी.सी.ए. यांसारखे कोर्सेस महाविद्यालयामध्ये साहेबांनी सुरु केेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुण्या-मुंबई सारख्या शहरांमध्ये जावे लागत नाही.पीएच.डी सेंटर असणारे ग्रामीण भागातील आपले महाविद्यालय हे पहिले महाविद्यालय. नवनविन कोर्सेस आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची साहेबांची आग्रही भूमिका असते.
निसर्गरम्य वातावरणात व किल्ले शिवनेरीच्या कुशीत वसलेल्या आपल्या महाविद्यालयाच्या वैभवामध्ये साहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली "सहकारमहर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब काळे प्रशासकीय इमारत“ भर घालते. भव्य क्रिडांगण, प्रशस्त व सुसज्ज ग्रंथालय याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी माफक दरातील कॅन्टीन व शालेय साहित्यांसाठी विद्यार्थी ग्राहक भांडार अशा अनेक सुविधा साहेबांच्या मार्गदर्शनातून अद्ययावत करण्यात आल्या आहेत. अद्ययावत -अत्याधुनिक प्रयोगशाळा, व्यावसायिक शिक्षण, इलेक्ट्राॅनिक्स, आय.टी., काॅम्पुटर सायन्स. यासारखे विषय आपल्या महाविद्यालयामध्ये साहेबांच्या संकल्पनेतून उपलब्ध आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी साहेब कला, क्रिडा आणि सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी आग्रही असतात. महाविद्यालयामध्ये केवळ मुलांसाठीच नाही, तर मुलींसाठी देखिल एन.सी.सी. सुविधा साहेबांनी सुरु केली आहे. राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) च्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये अनेक समाजोपयोगी कामे नेहमीच पार पाडली जातात. यामध्ये श्रमदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता आणि जनजागृती यांसारखे उपक्रम पार पाडले जातात. यासाठी साहेबांच्या कौतुकाची थाप नेहमीच पाठीवर असते.
श्री शिव छत्रपती महाविद्यालय हे फक्त शिक्षणापुरते मर्यादित राहिले नसून साहेबांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्युव्सच्या माध्यमातून नामांकित कंपन्यामंध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतात. आधुनिक सोयी-सुविधांद्वारे महाविद्यालयाचा नावलैकीक फक्त पुणे जिल्ह्यातच मर्यादित न राहता पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखिल आहे. आगदी सांगली, सातारा भागातले विद्यार्थी देखिल आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात. यातूनच महाविद्यालयाचा दर्जा स्पष्टपणे दिसून येतो. आणि हे शक्य झाले ते केवळ साहेबांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या दुरदृष्टीतून. शिक्षण क्षेत्रामध्ये साहेबांचे एक वेगळे वलय दिसून येते. आणि त्यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. साहेबांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देखिल अनेक वेळा येत असतो. अनेक आर्थिक दुर्बल घटकांतील, विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्यात येते. मार्च-एप्रिल 2022 मधिल, जुन्नर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पेढे आणि बुके देवून त्यांच्या शाळेवर जाऊन त्यांचा तसेच त्यांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार करायला सांगणारे आणि एवढ्यावरच न थांबता त्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये मोफत प्रवेश दिला जाईल अशी घोषणा करणारे साहेब हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव असावेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक साहेब नेहमीच करत असतात. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये बी.एस्सी. व एम. एस्सी. प्राणिशास्त्र विषयामध्ये सुवर्णपदक प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे देखिल साहेबांनी स्वतः कौतुक केले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, त्यातून देशाची सुसंस्कृत व कर्तबगार पिढी उदयास आली पाहिजे ही त्यांची अखंड तळमळ असते. होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना कधी सायकल तर कधी लॅपटाॅप बक्षिस म्हणून देणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे संजयराव काळे साहेब.
सध्या महाविद्यालयामध्ये सुमारे साडेपाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांतर्गत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, व्यवसाय शिक्षण, बी.बी.ए , बी.सी.ए तसेच वाणिज्य व प्राणिशास्त्र या विषयांच्या संशोधन केंद्राचाही समावेश आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत महाविद्यालयास शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी भरीव आर्थिक मदत मिळाली आहे. या शिवाय नॅक कडून महाविद्यालयास मिळालेला बी + दर्जा, विद्यापीठाचा ग्रामीण विभागाचा सर्वाेत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ठ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार, डाॅ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार, उत्कृष्ठ नियतकालीका पुरस्कार आणि अशा असंख्य पुरस्कारांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
१९७० साली स्थापन झालेल्या श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे संस्थापक सहकारमहर्षी आदरणीय शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन पुणे विद्यापीठ गोल्ड मेडलिस्ट, क्रेब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या ॲड. संजयराव शिवाजीराव काळे साहेब यांनी आपल्या दुरदृष्टीतून आणि नेतृत्वातून आपले महाविद्यालय हे एका विशिष्ठ उंचीवर नेवून ठेवले आहे. दादासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा एक भव्य-दिव्य वटवृक्ष करण्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या कल्पकतेतून, शिस्तबध्द आणि नियोजनबध्द धोरणांमधून साहेबांनी श्री शिव छत्रपती महाविद्यालयाची एक वेगळी ओळख संपुर्ण पुणे जिल्हयातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आहे. अशा या सहकाररत्न, शिक्षणप्रेमी, संवेदनशील आणि ध्येयवेडया व्यक्तिमत्वास त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयातर्फे उदंड आयुष्याच्या लाख लाख मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
प्रा.डाॅ. उत्तम शेलार
प्र. प्राचार्य,
श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर.
COMMENTS