सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : दिनांक २९/०७/२२ राजूर नं- १ , ता. जुन्नर. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : दिनांक २९/०७/२२ राजूर नं- १ , ता. जुन्नर.
ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी डिसेंट फाउंडेशन च्या वतीने कळी उमलताना हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबविला जात आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही मासिक पाळी विषयी आई व मुलगी यांच्यात संवाद नसल्याने वयात येताना मुलींमध्ये संभ्रम असतो तसेच मनामध्ये अनेक प्रश्न असतात. आणि म्हणूनच डिसेंट फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन १२ ते १८ या वयोगटातील मुलींना मासिक पाळी वैयक्तिक स्वच्छता आरोग्य आहार व व्यायाम या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. तसेच मोफत सॅनिटरी पॅड व मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटपही केले जाते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुर नंबर - १ व न्यू इंग्लिश स्कूल राजुर नंबर - १ या शाळांमधील जवळपास ७५ विद्यार्थिनींना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे प्रकल्प समन्वयक एफ.बी.आतार यांनी मुलींचे मानसिक आरोग्य या विषयावर तर अर्चना पवार यांनी मुलींना मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य, आहार व व्यायाम या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई, प्रकल्प समन्वयक एफ.बी.आतार, आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या गृहपाल अर्चना पवार, मुख्याध्यापक बाळासाहेब मोरे, यशवंत फापाळे, शिक्षक रमेश ढोमसे, नाना भोर, शारदा भोर, मेघा बाऊबंदे, संतोष वैजापूरे, कुलवडे, संतोष नाईकवडी, मुरकुटे उपस्थित होते.
COMMENTS