पुणेः येरवडा पोलिस स्टेशन चे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वनराज महेंद्र जाधव (वय 19 वर्ष रा. लक्ष्मी नगर पोलिस चौकीच्या मागे येरवडा पुणे) याल...
पुणेः येरवडा पोलिस स्टेशन चे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वनराज महेंद्र जाधव (वय 19 वर्ष रा. लक्ष्मी नगर पोलिस चौकीच्या मागे येरवडा पुणे) याला दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक 18/2022 म पो का कलम 56 (1)(अ)(ब) अन्वये दि. 28/06/2022 पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलिस उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, पोलिस नाईक सचिन माळी व पोलिस शिपाई देविदास वांढरे यांनी केली आहे.
COMMENTS