क्राईमनामा Live : माळशेज घाटात दरड कोसळली असून दरडीखाली टेम्पो अडकल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरविली जात आहे. मात्र असा कुठला...
क्राईमनामा Live : माळशेज
घाटात दरड कोसळली असून दरडीखाली टेम्पो अडकल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल करून अफवा
पसरविली जात आहे.
मात्र असा कुठलाच प्रकार माळशेज घाटात
घडलेला नाही, मात्र जुना व्हिडिओ व्हायरल करून लोकांमध्ये एक प्रकारची अफवा
पसरविली जात आहे, त्यामुळे माळशेज घाटातून नगर, पुणे व विविध भागातून या ठिकाणावर
पर्यटक फिरण्यासाठी येत असतात, मात्र आज दिवसभर या अफवेमुळे लोकांमध्ये एक
प्रकारची संभ्रमावस्था निर्माण केली होती. मात्र अशा प्रकारचे जुने व्हिडिओ
व्हायरल करून लोकांची दिशाभूल करू नका.
स्थानिक नागरीकांनी देखील या व्हिडिओच्या
बाबतीत नाराजी व्यक्त करत अशा अफवा व खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना जरब बसविण्याची
मागणी येथील नागरीक करत आहेत.
COMMENTS