लखनौ (उत्तर प्रदेश): मुजफ्फरनगरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारा वाईफ स्वॅपिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीला फस...
लखनौ (उत्तर प्रदेश): मुजफ्फरनगरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारा वाईफ स्वॅपिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीला फसवून दिल्लीच्या वाईफ स्वॅपिंग म्हणजेच एक्स्चेंज पार्टीमध्ये घेऊन गेला होता.
यानंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पीडित महिलेचे दुसरे लग्न गुरुग्रामच्या सौरभ डुडेजासोबत १४ जानेवारी २०२१ मध्ये झाले होते. पतीने शॉपिंग करायला जाऊया म्हणत तिला दिल्लीला वाईफ एक्स्चेंज पार्टीत घेऊन गेला. वाईफ एक्स्चेंज पार्टीत तिच्यावर अत्याचार झाला. यानंतर पुन्हा तिने पतीला असल्या पार्ट्यांना घेऊन जाण्यास नकार दिला. यावर त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.
पीडितेच्या आरोपानुसार, तिचा दीर शुभम डुडेजा यानेही तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. पतीकडे तक्रार केली तर त्याने याकडे दुर्लक्ष केले. शुभम अविवाहित आहे, जोवर त्याचे लग्न होत नाही तोवर त्याला खूश करत रहा, असे पतीने तिला सांगितले होते. विरोध केल्यावर तिला मारहाणही करण्यात आली. दीराने एकदा तिच्यावर बलात्काराचा व्हिडीओ बनविला आहे. पोलिसांकडे तक्रार केली तर सोशल मीडियावर तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तिने या प्रकाराला कंटाळून मुजफ्फरनगर एसएसपी आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, मात्र काहीच कारवाई झाली नाही, असे तिचे म्हणणे होते. यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पती आणि दीरावर गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.
COMMENTS