बाळासाहेबांसोबत 'सामना'चे इमानेइतबारे काम केले आणि अजून ही करीत आहेत. राऊत साहेबांनी बाळासाहेबांची भाषा व त्यांना हवी असणारी लेखन शै...
बाळासाहेबांसोबत 'सामना'चे इमानेइतबारे काम केले आणि अजून ही करीत आहेत. राऊत साहेबांनी बाळासाहेबांची भाषा व त्यांना हवी असणारी लेखन शैलीही आत्मसात केली व ते कधी कधी नाही तर नेहमीच बाळासाहेबांना पाहीजेत तसे अग्रलेख ही लिहित व त्या अग्रलेखांचे कौतुकही होत आले.
आजही या अग्रलेखांचे वाचन प्रत्येक न्यूज चॅनलवर होतच असते.
मग खरंच संजय राऊतांचे काय चुकले ?
बाळासाहेबांच्या नंतर संजय राऊत खंबीरपणे उद्धवजींच्या पाठीशी उभे राहिले. दरम्यान बाळासाहेबांच्या या शिवसेनेवर अनेक गिधाडे लचके तोडायचे प्रयत्न करीत होते. अनेक आक्रमणे झाली. शाब्दीक हल्ले झाले. युती तुटल्यानंतर यात पराकोटीची वाढ झाली. पालघर हत्त्याकांड, सुशांतसिंग राजपूत, अर्णब गोस्वामी, कंगना राणावत, नारायण राणे, वाझे प्रकरण, नवनित राणा असे अनेक वाद झाले. पण या वादांना व संकटाना अंगावर घेऊन शिंगावर घेणारा शिवसेनेत संजय राऊतांशिवाय दुसरा नेता कोणीच दिसला नाही. कोण सांगू शकते का असा शिवसेनेत दुसरा नेता ? आणि हेच शिवसेना विरोधकांना टोचते आणि टोचत राहील, बाकी संघटनेचे फायदे सारे घेतात पण संकट अंगावर घेतात ते फक्त संजय राऊत व सामान्य शिवसैनिकच. आणि म्हणूनच राऊतांना विरोधक व काही स्वकीय ही बदनाम करतात आणि काही मूठभर शिवसैनिकही त्यावर विश्वास ठेवतात. मग ईडी असो वा धमकी संजय राऊतांनी घाबरून कधी रंग बदलले नाही, ना दिल्ली दरबारी शरणागती पत्करली...
सर्वसामान्य शिवसैनिकांचे दैवत !
COMMENTS