ग्रामीण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : शिंदे – आपटाळे येथील दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू असून पुलाचे काम अतिशय दर...
ग्रामीण प्रतिनिधी : आत्माराम
उंडे.
क्राईमनामा Live : शिंदे
– आपटाळे येथील दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू असून पुलाचे काम अतिशय
दर्जेदार पध्दतीने सुरू आहे, मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने लोकांची गैरसोय
होत असल्याने हे काम लवकर पुर्ण व्हावे अशी येथील नागरीक मागणी करत आहेत.
शिंदे ते आपटाळे या पुलाला पावसाळ्यामध्ये
मोठे खड्डे पडायचे व संरक्षण कठडे नसल्याने दुचाकी व चार चाकी वाहन चालकांना जीव
मुठीत धरून प्रवास करावा लागायचा अशातच या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणीदेखील
उलटण्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे दोनही गावांचा संपर्क तुटायचा यामुळे या
पुलावरून पश्चिम भागातील शिंदे, राळेगण, बोतार्डे, सोनावळे, घंगाळदरे, हिवरे या
गावांतून ये-जा करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती, त्यामुळे
जुन्नरला जाण्यासाठी बेलसरच्या पुलाचा पर्यायी वापर व्हायचा, यामुळे जवळच्या गावांचा
संपर्कदेखील तुटला जायचा.
मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून
शिंदे ते आपटाळे या पुलाचे अतिशय चांगले व दर्जेदार काम सुरू असून या पुलाचे कॉलम
पुर्ण झालेले आहेत, मात्र हे काम संथ गतीने सुरू असून या वेळीदेखील लोकांना
पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार असल्याने या गावांतील नागरीकांची एकच मागणी
आहे की, कामाचा दर्जा चांगला आहे मात्र काम वेळेत व लवकर पुर्ण व्हावे अशीच या भागातील
नागरीकांची मागणी आहे.
COMMENTS