विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर येथे श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये दि. १८ जुलै २०२२ रोजी इ.११वीच्या...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर येथे श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये दि. १८ जुलै २०२२ रोजी इ.११वीच्या शैक्षणिक वर्ष २o२२-२०२३ची सुरुवात करताना विद्यार्थ्यांचे आनंदी व उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले.
कला, वाणिज्य व विज्ञान, एम. सी. व्ही. सी या सर्व शाखेतील विद्यार्थांच्या हातून फीत कापून व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून प्राध्यापक व प्राध्यापिकांनी अतिशय उत्साहात व आनंदाने स्वागत केले. आणि सर्व विद्यार्थ्यांचा कॉलेजचा पहिला दिवस संस्मरणीय केला.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. पी. एस. लोढा, पर्यवेक्षक प्रा.एस. ए. श्रीमंते, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. पी.व्ही.तांबे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पी.आर. कासार तसेच व्होकेशनल विभाग प्रमुख प्रा.के.जी. नेटके आदी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ. उत्तम शेलार आणि संस्थेचे अध्यक्ष प्रतिनीधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांनी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजयराव शिवाजीराव काळे साहेब तसेच संस्थेचे विश्वस्त यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी व उत्तम करिअर साठी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS