ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. दरम्...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.
दरम्यान, या पावसामुळे राळेगण येथील लक्ष्मण जानकू उंडे यांच्या शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतातील शेतीपिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या भागामध्ये मागील काही दिवसांमध्ये पाऊस बरसल्याने भिवाडे व घंगाळदरे या दोन धरणे भरल्यामुळे यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मीना नदी दुथडी भरून वाहत होती.
या भागातील शेतकर्यांची क्रृषी विभाग यांना विनंती आहे की या परिसरातील शेतकर्यांच्या झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशीच या भागातील शेतकरी बांधवांची मागणी आहे.
COMMENTS