पुणेः शितल लॉजमध्ये महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस भारती विदयापीठ पोलिसांनी आठ तासाच्या आत अटक करुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. याबाबत पोल...
पुणेः शितल लॉजमध्ये महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस भारती विदयापीठ पोलिसांनी आठ तासाच्या आत अटक करुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
११/०७/२०२२ रोजी
सकाळी ११.०० वा. चे सुमारारा शितल लॉज येथे एकाने महिलेचा गळा चिरला होता.
याबाबतची माहिती मिळाल्याने भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील पोलिसांनी तात्काळ
शितल लॉज येथे भेट दिली असता तेथे एक महिला बाथरुममध्ये मृत अवस्थेत पडल्याची
दिसून आली. सदर ठिकाणी मिळून आलेल्या माहिती वरुन मृत महिलेची ओळख पटविण्यात आली.
सदर वेळी वरीष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून आरोपींचा शोध घेणेबाबत तपास
पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व
अंमलदार हे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
प्राप्त
माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक नितीन शिंदे, व पोलिस अंमलदार अशिष गायकवाड, मितेश चोरमोले, धनाजी धोत्रे, राहुल तांबे यांनी
डेक्कन पोलिस स्टेशन हद्दीत आरोपीचा शोध घेतला असता त्याचे बाबत काही माहिती मिळून
आली नाही. परंतु, सदर वेळी आरोपीचा चालू मोबाईल नंबरची माहिती मिळून आली. सदर मोबईलचे
तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपीताचा सध्याचा राहता पत्ता फ्लॅट नंबर ५०१, साई आंगण अपार्टमेंन्ट, लगड कॉलनी, पाण्याची टाकीजवळ, नांदेड सिटी रोड, पुणे असा पत्ता मिळून
आला. त्यानुसार वरील पोलिस अधिकारी व अंमलदार हे वर नमुद नांदेड सिटी येथील
पत्यावर गेले. आरोपी सचिन शिंदे याचा शोध घेत असताना आरोपी सचिन शिंदे हा नवले
पुलाखाली असल्याची माहीती गोपनीय बातमीदारामार्फेत मिळाल्याने भारती विदयापीठ
पोलिस स्टेशनकडील पोलिसांनी नवले पुलाखाली जावून तेथे सापळा रचला.
आरोपी सचिन
शिंदे यास दिनांक ११/०७/२०२२ रोजी ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करता त्याने
महिलेच्या खुनाची कबुली दिली आहे. महिलेचा पती राधाकिसन उत्तम काठमोरे यांनी
दिलेल्या फिर्यादीवरुन भारती विदयापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५५/२०२२
भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. त्यामध्ये आरोपी सचिन राजु शिंदे
(वय ३०) यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई
राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, सागर पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, सुषमा चव्हाण सहाय्यक
पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संगीता यादव, पोलिस निरीक्षक
(गुन्हे), पोलिस उप निरीक्षक
नितीन शिंदे, धिरज गुप्ता, पोलिस अंमलंदार, गणेश भोसले, रविंद्र चिप्पा, नरेंद्र महांगरे, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, सचिन गाडे, अशिष गायकवाड, अभिनय. चौधरी, मितेश चोरमले, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, विक्रम सावंत, नवनाथ खताळ, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे, तुळशीराम टेंभुर्णे, निलेश खैरमोडे, मंगेश बोरडे, राहुल शेडगे, रविंद्र भोरडे यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS