ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पच्छिम भागात जोरदार पाऊस बरसत असल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत....
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पच्छिम भागात जोरदार पाऊस बरसत असल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.
राळेगण येथील मिना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आल्यामुळे राळेगण येथील दोन्ही के.टी बंधाऱ्यांवरून पाणी जोरदार प्रवाहाने वाहत असल्याने येथील के.टी बंधारे पूरामुळे दिसत नाहीत.
या भागामध्ये गेले तीन ते चार दिवसांपासून पाऊस बरसत असल्याने शेतकर्यांच्या शेतातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने सोयाबीन व भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील भिवाडे व घंगाळदरे हि दोन धरणे भरल्यामुळे या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मीना नदी दुथडी भरून वाहत आहे, तसेच नदी काठावरील गावांतील नागरीकांनी दक्षता घ्यावी.
या महापूराला पाहण्यासाठी परिसरातील नागरीक येतायत, शक्यतो दूरवरूनच हे द्दष्य नजरेने पाहताना एक वेगळाच रोमांचक दिसून येत आहे, मात्र धोका पत्करून कुणीही या नदीच्या किनारी जाऊ नका असेदेखील आवाहन करण्यात येत आहे.
खरं म्हणजे या पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील भिवाडे, आंबे, हातवीज, सोनावळे, हिवरे, शिंदे, राळेगण, बोतार्डे, आपटाळे व इतरही गावांमध्ये चांगला पाऊस झाल्याने नागरिक व तरूणाई समाधान व्यक्त करत आहेत.
:-क्राईमनामा Live विनम्र सूचना- जोरदार पावसामुळे नदी नाले तुडूंब भरून वहात असल्याने आपला अनमोल जीव कुणीही धोक्यात घालून स्टंट करू नयेत.
COMMENTS