सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रोटरीच्या माध्यमातून सुमा...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रोटरीच्या माध्यमातून सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी दिली.
डॉक्टर्स डे चे औचित्य साधून "स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र-वारूळवाडी" या उपक्रमांतर्गत या प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज ओळखून आवश्यक साहित्य रोटरीच्या माध्यमातून भेट स्वरूपात देण्यात आले.
या रोटरी भेट साहित्यात संगणक संच-3, बेबी वॉर्मर-1, सक्शन मशिन-1, मेडिकल रॅक-2, आवश्यक स्टेशनरी आदी उपयोगी असलेले साहित्य रोटरी भेट स्वरूपात देण्यात आले.
याप्रसंगी नारायणगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश मेहेर,ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर,नाशिक विभागाचे माजी उपायुक्त सुखदेव बनकर साहेब, युवानेते अमित बेनके, वारुळवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर, माजी सरपंच जंगलभाऊ कोल्हे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ मॅडम, फर्स्ट लेडी निर्मला मेहेर, अरविंद ब्रह्मे काका, डॉ. आनंद कुलकर्णी तसेच रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिरत्न अनिलतात्या मेहेर होते. या वेळी अनिलतात्या मेहेर, सुखदेव बनकर साहेब, मंगेश मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन योगेश भिडे, संदिप गांधी, तेजस वाजगे, प्रिया कामत यांनी केले.
या स्तुत्य सामाजिक उपक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट पुणे 3131चे प्रांतपाल पंकज शहा,रोटरी डिस्ट्रिक्ट नाशिक 3030 चे प्रांतपाल रमेश मेहेर व रोटरी क्लब ऑफ नारायणगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सचिन घोडेकर यांनी केले तर डॉ.वर्षा गुंजाळ मॅडम यांनी आभार मानले.
COMMENTS