सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : श्री. शिवाजी मराठा शिक्षण संस्था ( शिवनेर ) जुन्नर संचलित प्राथमिक विद्यामंदिर व बा...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : श्री. शिवाजी मराठा शिक्षण संस्था ( शिवनेर ) जुन्नर संचलित प्राथमिक विद्यामंदिर व बालकमंदिर बारव या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते. विविध भजने गात विद्यार्थ्यांनी बारव परिसरात दिंडी काढली.
यावेळी बारव परिसरातील ग्रामस्थ सुमन मिरगुंडे व सुमन केदारी यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
बारव परिसरात प्रदक्षिणा घालून आल्यानंतर हनुमान मंदिराजवळ
विद्यार्थ्यांनी रिंगण धरले यावेळी पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र ढोबळे, बालकमंदिर विभाग प्रमुख मनिषा
काशिद शाळेतील शिक्षक रेश्मा गावडे, सुरेखा काळे, अलका करडे, विवेक हिंगे, नामदेव
माळी, माधुरी फुलसुंदर, माधवी पुरी, महानंदा घोळवे, रोहिणी तोरकडी, शिला निंबाळकर
आदि उपस्थित होते.
COMMENTS