आरोग्य टिप्स : पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. अमिबियासिस हा देखील अशाच आजारांपैकी एक आहे. पावसाळ्यात चक्कर येणे , ताप येणे किंवा अशक्त...
आरोग्य टिप्स : पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. अमिबियासिस हा देखील अशाच आजारांपैकी एक आहे. पावसाळ्यात चक्कर येणे, ताप येणे किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर ही अमिबियासिसची लक्षणे असू शकतात. पावसाळ्यात या संसर्गाचा धोका लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाढतो, त्यामुळे जर तुमच्या घरात लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांची या संसर्गापासून काळजी घेतली पाहीजे
ई.
हिस्टोलिटिका नावाच्या परजीवीमुळे होणारे हे संक्रमण आहे, जे मुख्यतः आतड्यांना
नुकसान करते. जेथे स्वच्छ पाणी मिळत नाही अशा भागात हा संसर्ग वाढतो. परजीवी
पाण्यात आढळतात, त्यामुळे
पावसाळ्यात त्यांचा जलद प्रसार होण्याचा धोका वाढतो.
लक्षणे
जर तुम्हाला
पावसाळ्यात ताप आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर ते अमिबियासिसचे
लक्षण असू शकते आणि अशा परिस्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
अमिबियासिसच्या मुख्य लक्षणांबद्दल जाणून घेऊया –
1.पोटदुखी
2.मळमळ आणि
उलटी
3.वजन कमी होणे
4.अतिसार
अमिबियासिस
कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो आणि त्याची मुख्य लक्षणे वर नमूद केली आहेत. मात्र, पावसाळ्यात
याचा धोका अधिक वाढतो.
अमिबियासिसचे उपचार सहसा त्याची
तीव्रता आणि लक्षणांवर अवलंबून निर्धारित केले जातात. मेट्रोनिडाझोल औषधे
सामान्यतः या परजीवींच्या संसर्गावर उपचारासाठी वापरली जातात. यासोबतच काही
प्रकारचे अँटिबायोटिक्सही दिले जाऊ शकतात.
COMMENTS