आरोग्य टिप्स : नुकतेच आपण पहिला प्रोटीन डे साजरा केला. शाकाहारी लोकांच्या प्रोटीनची गरज त्यांच्या आहारातून भागवली जाते की नाही असा प्रश्न अस...
आरोग्य टिप्स : नुकतेच आपण पहिला प्रोटीन डे साजरा केला. शाकाहारी लोकांच्या प्रोटीनची गरज त्यांच्या आहारातून भागवली जाते की नाही असा प्रश्न असतो. त्यामुळे अनेक जण सप्लीमेंटचा आधार घेतात. पण असे काही शाकाहारी पदार्थ आहेत, ज्यातून आपली प्रोटीनची गरज भागवली जाऊ शकते. जाणून घेऊया या पदार्थांबाबत.
आपल्या
शरीराला वजनानुसार प्रोटीनची गरज वेगवेगळी असते. आरडीएनुसार आपल्या शरीराला दररोज 0.8
ग्रॅम
प्रतिकिलो प्रोटीनची गरज असते. पण कॅलरी इनटेक आणि शारीरीक हालचालींनुसार याचे
प्रमाण वेगवेगळे असू शकते.
सोयाबीन
सोयाबीनला
हाय प्रोटीन फुड मानले जाते. 50 gm सोयाबीनपासून 25 ग्रॅम प्रोटीन मिळते.
याशिवाय एवढ्या सोयाबीनमधून 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स
आणि खुपच कमी प्रमाण फॅट्स मिळतात. पण सोयाबीनचे सेवन हे प्रमाणातच करायला हवे, कारण प्रमाणापेक्षा
जास्त सोयाबीनच्या सेवनाने इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.
डाळी
अनेक
जण दररोज डाळ खातात. एक वाटी टाळीतून 15 ते 18 ग्रॅम प्रोटीन मिळते.
डाळींमध्ये
फायबरही भरपूर प्रमाणात असतात. डॉक्टर्सही आहारात डाळींचे सेवन करण्याचा सल्ला
देतात कारण डाळींमुळे हृदयरोग, डायबिटीज आणि कँसरसारख्या
आजारांपासून बचावास मदत मिळते.
राजमा
राजमा
हा अनेकांच्या आवडीचे कडधान्ये. 100 ग्रॅम शिजवलेल्या
राजमामधून 9 ग्रॅम
प्रोटीन 1- 2 ग्रॅम फॅट आणि 23 ग्रॅम कार्ब मिळतात.
याशिवाय यातून 6 ग्रॅम
फायबर मिळते.
हरभरा
हरभरा
हाय कार्ब फुड मानले जाते. 100 ग्रॅम हरभर्यातून 9 ग्रॅम प्रोटीन आणि 9 ग्रॅम फायबर मिळते. यात
फॅटचे प्रमाणही 1 ते
2 ग्रॅम
असते.
शेंगदाणे
शेंगदाणे
प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहेत. 30 ग्रॅम शेंगदाण्यामधून 7 ग्रॅम प्रोटीन मिळते, तर 14 फॅट, 6
ग्रॅम
कार्बोहायड्रेट् मिळतात.
पनीर
पनीर
प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटीन मिळते.
तर 20 ग्रॅम फॅट मिळते.








COMMENTS