आरोग्य टिप्स : उन्हाळ्यातील रखरखीत उन्हानंतर आलेला पावसाळा आनंद देऊन जातो.पावसाळा हिरवाई घेऊन येणारा ऋतू असला तरी सोबतच अनेक आजारांना निमंत्...
आरोग्य टिप्स : उन्हाळ्यातील रखरखीत उन्हानंतर आलेला पावसाळा आनंद देऊन जातो.पावसाळा हिरवाई घेऊन येणारा ऋतू असला तरी सोबतच अनेक आजारांना निमंत्रण देणाराही हा ऋतू आहे. यात साध्या सर्दी खोकल्यापासून ते डेंग्यू, मलेरीया, टायफॉईड, कावीळ अशा अनेक आजारांचा समावेश होतो.
जाणून घेऊया या आजारांची लक्षणे आणि यांच्या निदानासाठी करायवयाच्या चाचण्यांबाबत.
>मलेरिया-
डासांच्या चाव्यामुळे होणारा हा आजार पावसाळ्यात जास्त पसरतांना दिसतो. साचलेल्या पाण्यात जन्मम घेणाऱ्या अॅनाफिलीस जातीच्या डासाने चावा घेतल्यास हा आजार होतो.
>लक्षणे-
थंडी वाजून ताप येणे
रूग्णाला घाम येणे
शरीरात तीव्र वेदना होणे.
>चाचणी-
मलेरियाचे निदान करण्यासाठी मलेरिया पॅरासाइट चाचण्या केल्या जातात. या मायक्रोस्कोपी आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट द्वारे केल्या जातात.
>टायफॉईड-
हा दुषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. एस. टायफी नावाच्या जीवाणूमुळे हा होतो.
>लक्षणे-
या आजारात येणारा ताप दिवस मावळतो तसा वाढतो आण. सकाळी आपोआप कमी होतो.
ओटीपोटात तीव्र वेदना
अतिसार
थकवा आणि डोकेदुखी.
>चाचणी-
रक्त, लघवी तपासणीद्वारे या आजाराचे निदान केले जाते.
>डेंग्यू-
हा आजार एडिस इजिप्तीस जातीच्या डासाच्या चाव्यामुळे होतो.
>लक्षणे-
अचानक खूप ताप येणे
तीव्र डोकेदुखी
तीव्र शारीरिक वेदना
भूक न लागणे
त्वचेवर पुरळ आणि थकवा
रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे
>चाचणी-
डेंग्यूसाठी केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सीबीसी डेंग्यू आयजीएम, आण. एनएसवन, अँटीजेन टेस्ट यांचा समावेश होतो.
>चिकुनगुनिया-
हा आजार एडिस अल्बोपिक्टस डासांच्या चाव्यामुळे होतो.
>लक्षणे-
ताप येणे
उलट्या होणे
त्वचेवर पुरळ
सांधेदुखी
चाचणी-
या आजाराच्या निदानासाठी व्हायरस आयसोलेशन टेस्ट केली जाते. यासाठी आयजीएम टेस्टही केली जाऊ शकते.
COMMENTS