सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) विद्यार्थी विकास मंडळ व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे यांच्या संयुक्त विद्...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
विद्यार्थी विकास मंडळ व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतीच एकदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील "ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान" या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष वसंतरावजी शेळके व भारत संचार निगम लि.चे अतिरिक्त जनरल मॅनेजर विनोद महाजन यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके सर, समर्थ अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर, रा से यो समन्वयक प्रा.विपुल नवले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.
या प्रकल्प स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातून १५० प्रकल्प आणि ३८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कल्पकतेला वाव मिळावा या हेतूने नवनवीन कल्पना, तंत्रज्ञानाची जोड देऊन समाजाभिमुख केलेल्या नवीन कलाकृती आणि यासारखे विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संकल्पनेचा आविष्कार या कार्यशाळेत दिसून आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विनोद महाजन म्हणाले की ग्रामीण विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांची कल्पकता, नवनिर्मिती पाहायला मिळते. दैनंदिन जीवनात आपल्या तांत्रिक कौशल्याचा, शिक्षणाचा उपयोग करून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा.
इंजिनियर म्हणजे उत्साह, प्रयत्न, ऊर्जा, कार्यक्षमतेचा अखंड स्रोत असून अर्थव्यवस्था बळकट करणारा समाजातील सर्वात जबाबदार घटक म्हणून त्याकडे पाहिले जाते असे महाजन म्हणाले.
प्रकल्प स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:
इंजिनिअरिंग विभाग:
कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक-क्षितिज ठाकरे, तेजस्वी श्रीरंगम
(स्मार्ट अक्सिडंट मॅनेजमेंट सिस्टीम)
द्वितीय क्रमांक -शितल कोरडे, श्रद्धा फदाले (वायरलेस बेस कोलीजन अव्हॉडन्स सिस्टीम फॉर रेल्वे सेक्टर)
तृतीय क्रमांक-आदित्य गुंजाळ, सिद्धांत वाकचौरे, श्रेयस जाधव, मयूर चिकने (ब्रिज सेक्युरिटी अँड सायरन सिस्टीम)
मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक-विशाल शिंदे
(जिओ सिंथेटिक युज इन रोड कन्स्ट्रक्शन)
माधवी राहाणे
(डिझाइन ऑफ बायोगॅस प्लांट)
द्वितीय क्रमांक-
सुदर्शन आरोटे,ऋत्विक गोरडे, अक्षय कानवडे, आकाश कांदळकर
(फ्लोटिंग मेम्बर सपोर्ट जॉईंट)
तृतीय क्रमांक -
प्राची पांचाळ
(वॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टीम)
सुप्रिया वलवे
(नेबरहुड प्लॅनिंग)
पॉलिटेक्निक विभाग:
कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक-
सिद्धी सरोदे, रोहन लबडे
(वायरलेस इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉईंट स्टेशन)
द्वितीय क्रमांक-
अलिशा पठाण, वेदांत तांबे, समर्थ कराळे, हितेश आतकर
(ऑनलाईन वोटिंग सिस्टीम)
तृतीय क्रमांक-
प्रणाली हिंगाडे, अपेक्षा काळेकर
(स्मार्ट कॉपोनंट टेस्टिंग यूजिंग अरडीनो)
मेकॅनिकल व सिव्हिल पॉलिटेक्निक विभाग:
प्रथम क्रमांक-
नवनाथ झावरे, सिद्धार्थ गायखे, मयूर गाडगे, वल्लभ गाडगे
(रोबोटीक व्हिल चेअर)
द्वितीय क्रमांक-
विनीत पानसरे
(फायबर रेन्फोर्स काँक्रीट)
अश्विनी शिंदे
(अनालिसिस ऑफ इलेव्हेटेड वॉटर टँक)
तृतीय क्रमांक -
साईराज गाडेकर, सनी व्यापारी, कृष्णा पोखरकर, शुभम टेमगिरे
(इलेक्ट्रिक बायसिकल)
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रकल्प स्पर्धेसाठी सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी नरवडे हिने यांनी, प्रास्ताविक प्रा.स्वप्नील डुंबरे यांनी तर आभार प्रा.प्रवीण सातपुते यांनी मानले.
COMMENTS