पुणे: कारेगाव (ता. शिरुर) येथील काही युवकांनी शिरुर शहरात नागरीकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने दुचाकी गाडीवर रॅली काढल्याने आठ ते दह...
पुणे: कारेगाव (ता. शिरुर) येथील काही युवकांनी शिरुर शहरात नागरीकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने दुचाकी गाडीवर रॅली काढल्याने आठ ते दहा युवकांसह इतर अनोळखी व्यक्तींवर शिरुर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी राजेंद्र गोपाळे यांनी फिर्याद दिली आहे.
लोणीकंद येथील मयत आरोपी गोल्ड मॅन सचिन शिंदे याच्या स्मृतीप्रित्यर्थ बुधवारी (ता. २९) दुपारी दोनच्या सुमारास शिरुर शहरात प्रथमेश नवले, हर्षल गोसावी, प्रज्वल सातकर, कोहकडे, संकेत गुजर, अभि पवार, राजकुमार, रितेश चौधरी (सर्व रा.कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे) प्रथमेश यादव (रा.शिरुर, जि. पुणे) आदीत्य पंचमुख (रा. कोंढापुरी ता.शिरुर, जि. पुणे) तसेच ८ ते १०अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल झाला असुन या सर्व आरोपींनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदा गर्दी जमाव जमवुन मोटारसायकल वरुन रॅली काढत रस्त्यावरुन जाताना मोठ्याने ओरडुन दुचाकी भरधाव वेगात चालवली.
दुचाकीची रेस करत मोठा आवाज काढला तसेच बुलटचे फटाकडे वाजवुन सार्वजनिक शांततेचा भंग करत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रॅली काढलेली होती. त्यामुळे त्यांच्यावर कलम २७९, १४३, १४७, १४९ मोटार वाहन कायदा कलम १८४, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०, ११२, ११७ सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नाजीम पठाण हे पुढील तपास करत आहेत.
'तो' एक मेसेज आणि पोलिसांची पळापळ...
बुधवार (दि २९) रोजी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मोबाईलवर एक निनावी मेसेज आला. त्यात शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील एका गजबजलेल्या सोसायटीच्या बाजूलाच असलेल्या मोकळ्या मैदानात लोणीकंद (ता. हवेली) येथील मयत आरोपी गोल्डमॅन सचिन शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त काही सराईत गुन्हेगार बॅनर लाऊन डॉल्बीच्या आवाजात वाढदिवस साजरा करणार आहेत. शिवाय, आलेल्या सगळ्या मुलांसाठी बर्थडे पार्टी निमित्त बिर्याणीची सोय करण्यात आली आहे. आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचा या आरोपींचा उद्देश असल्याचा त्या मेसेज मध्ये उल्लेख केला होता. पोलिस अधिक्षक देशमुख यांनी तातडीने त्या मेसेजची दखल घेत शिक्रापूर, रांजणगाव गणपती, शिरुर या तिन्ही पोलिस ठाण्याला योग्य सुचना दिल्या होत्या.
COMMENTS