पुणेः संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवता यावा यासाठी पुणे पोलिसांनी खास लाईव्ह ...
पुणेः संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवता यावा यासाठी पुणे पोलिसांनी खास लाईव्ह पालखी ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे.
श्री क्षेत्र आळंदी देवाची येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्री क्षेत्र देहुमधुन जगद्गुरु संत तुकाराम महाराज दोन्ही पालखी प्रस्थान सोहळा २२ जुन रोजी पुण्यात दाखल होणार आहे. पालखी मार्गाची सर्व माहिती नागरीकांसह वाहन चालकांना मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी खास वेबपेज (diversion.punepolice.gov.in) तयार केले आहे. त्यामुळे नागरीकांना आणि वाहन चालकांना मोबाईलसह, लॅपटॉपव्दारे एका क्लिकवर सर्व पालखी अपडेट मिळणार आहे. पालखी प्रस्थान दरम्यान होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वेबपेजचा उपयोग होणार आहे. बंद असलेले रस्ते वाहतुकी
साठी खुले असलेले रस्ते, पालखीचा मुक्काम याची माहिती नागरीकांना वेबपेजव्दारे मिळणार आहे. त्यामुळे वाहतूक व दैनंदिन जीवनातील कामे सुरळीत होण्यास मदत होईल.
पुणे पोलिसांनी तयार केलेल्या वेबपेज diversion.punepolice.gov.in या लिंकवर क्लिक करुन नागरीक पालखी सोहळा आणि वाहतुक मार्गातील बदलाची माहिती घेऊ शकतात. पालखी दरम्यान बंद होणारे रस्ते, वाहन चालकांना वापरता येणारे मार्ग प्रमुख चौकात पालखी पोहोचण्यास लागणारा अपेक्षित वेळ, विसाव्याचे ठिकाण, शहरामध्ये पालखी आगमनानंतर व शहरातुन प्रस्थान होईपर्यत वाहतुकीत करण्यात येणा-या बदलाची माहिती वेबपेजव्दारे आपणास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे फक्त एका क्लिकवर वारी सोहळयाचे अपडेट मिळवणे सोपे होणार आहे. तसेच एसएसपीएमएस कॉलेज मैदान, सिंचननगर, रेसकोर्स याठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी व पालखीतील वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केलेली आहे. वर नमुद पार्किंग ठिकाणे diversion.punepolice.gov.in या वेबपेजवर दर्शविण्यात आलेली आहे. सदर वेबपेजचा वापर करुन होणारी संभाव्य गैरसोय टाळून नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
COMMENTS